विज बिलांच्या रकमेत 50 टक्के सवलत द्या:कामत

0
587
गोवा खबर: गोव्यातील वीज ग्राहकांच्या दोन महिन्यांच्या बिलांतील निश्चित शुल्कात दिलेली ५० टक्के सवलत निष्काळजीपणे घेतलेला निर्णय आहे.  त्यामुळे कोविड संकट व आर्थिक मंदीच्या संकटात सापडलेल्या लोकांना कोणताच दिलासा मिळणार नाही. मुख्यमंत्र्यानी काॅंग्रेस पक्षाने वीज बिलांच्या रकमेत ५० टक्के सुट देण्याची केलेली मागणी मान्य करावी ,असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

काॅंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निरंतर पणे संपुर्ण गोव्यात वाढिव वीज बिलांचा विषय घेऊन निदर्शने केली. काल समाजमाध्यमांवर ‘स्पिक अप फॅार गोवा’ हि मोहिम राबवुन हजारो लोकांचे वीज बिले माफ करण्याची मागणी सरकारकडे पोचवली. काॅंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे  अभिनंदन करतो व सरकार आम्हाला परत आंदोलन करण्यास भाग पाडणार नाही अशी आशा बाळगतो,असे कामत म्हणाले.
कामत म्हणाले, सरकारने लोकांप्रती संवेदनशीलता दाखवुन त्यांना  दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कोविड संकट व आर्थिक मंदीत लोक दबले गेले आहेत हे सरकारने लक्षात ठेवावे.