विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या ६व्या आवृत्तीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले उद्धाटन

0
261
  • हा उत्सव १७ आणि १८ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
  • या महोत्सवात चार विज्ञान वैशिष्ट्यीकृत चित्रपटांचे प्रदर्शन, इनोव्हेशन प्रदर्शन, शिक्षकांसाठी कार्यशाळे तसेच फिल्म मेकिंगव मास्टर क्लास यांचा समावेश आहे.
गोवा खबर : विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या ६ व्या आवृत्तीचे उद्घाटन बुधवारी, १७ मार्च २०२१ रोजी आयनोक्स, पणजी येथे करण्यात आले. मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सुभाश फळ देसाई, ईएसजीचे उपाध्यक्ष, लेविन्सन मार्टिन्स, संचालक, विज्ञान, तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन विभाग, निमश कपूर, संयोजक आयएसडब्ल्यू, विज्ञान प्रसार, नवी दिल्ली, प्राचार्य हरिलाल मेनन, गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधि, डॉ. एकनाथ चाकुरकर, डायरेक्टर, मध्य तटीय कृषी संस्था, जयंत सहस्रबुद्धे, राष्ट्रीय संघटन सचिव, विज्ञान भारती, शेखर सरदेसाई, विज्ञान चित्रपट महोत्सवाचे संरक्षक, सीएसआयआर-एनआयओचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह आणि विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यांच्या उपस्थितित करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे, या वर्षाचा उत्सव १७ आणि १८ मार्च पर्यंत मर्यादित आहे ज्यामध्ये चार विज्ञान विषेश चित्रपट, अभिनव प्रदर्शन, शिक्षकांसाठी कार्यशाळे तसेच फिल्म मेकिंगवरील मास्टर क्लास यांचा समावेश असेल. या सर्व उपक्रमांची सुरूवात विद्यार्थ्यांमधील विज्ञानाच्या संकल्पनांना पोहचविण्याच्या उद्देशाने केली गेली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली व त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विज्ञान चित्रपट महोत्सव समितीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. “या महोत्सवाचा उद्देश विज्ञान चित्रपटांची स्क्रीनिंग करणे आणि विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण गोष्टी आणणे हा आहे. विज्ञान गोव्यातील तरूण, प्रतिभावान आणि हुशार मनापर्यंत पोचले पाहिजे आणि आपल्या तरूणांनी अभिनव विचार करण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे. युवा मनांना नाविन्यपूर्णतेने प्रज्वलित केले पाहिजे आणि असे करण्यासाठी संशोधन संस्थांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. जर त्यांनी आता या संशोधन संस्थांना भेटी दिल्या तर विज्ञानाची आवड व रस विकसित होईल. म्हणून, ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभव देखील महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांनी इच्छुक असलेल्या नाविन्यपूर्ण क्षेत्राला भेट द्यावी आणि मला खात्री आहे की भविष्यातही आम्ही विविध संशोधन क्षेत्रात असे उपक्रम राबविण्यात मदत करू,” असे डॉ. सावंत यांनी म्हटले.
विज्ञान आणि सिनेमा यांच्यातील सहकार्य साजरा करण्यासाठी, सिनेमा जगाकडे सहभाग्यांची मने उघडण्यासाठी देखील महोत्सव प्रयत्नशील आहे. यावर विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटनचे सचिव, जयंत सहस्रबुद्धे टिप्पणी देताना म्हणाले, “चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना विज्ञानाविषयी जागरूक करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आमचे माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी या महोत्सवाला प्रोत्साहन दिले. त्यांना देखिल विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचि आवड होती आणि गोव्यात त्यांचे विचार आणि विज्ञान प्रसार या महोत्सवा अंतर्गत समाजात पोहोचू शकतो.”
महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीपासून एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा आणि नॅशनल ओशनोग्राफी सह-संयोजक आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळ देसाई म्हणाले, “मी दोन वर्षांपासून ईएसजीच्या माध्यमातून या महोत्सवात भाग घेत आहे. विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रवृत्त करण्याची ही मोठी संधी आहे. अशा महोत्सवाचा एक भाग म्हणून आपण आपल्या देशासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करणे आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की नवीन शैक्षणिक धोरणात नाविन्यपूर्ण आणि संशोधनाच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आणण्याची दृष्टी आहे. आपल्या देशात चांगली बौद्धिक क्षमता आहे आणि भारतीय जेथे-जेथे जातात तेथे ते अभिमान बाळगतात,” असे त्यांनी म्हटले.
पुढील दोन दिवसांतील सर्व कार्यक्रम विज्ञानाच्या विविध पैलूंना समाविष्ट करण्याच्या उद्देशाने आखले गेले आहेत. म्हणूनच, प्रत्येक क्रियाकलाप त्या मूल्यांची प्रेरणा देईल हे सुनिश्चित केले गेले आहे.
“गेल्या चार वर्षांपासून मी या उत्सवाशी संबंधित आहे आणि हे मी माझे भाग्य समजतो. विज्ञानाची गरज प्रत्येक बाबतीत भासते आणि भारतात विज्ञान कश्याप्रकारे प्रसारित करता येईल याची काळजी हा उत्सव घेत आहे. प्रत्येक मनुष्य एक वैज्ञानिक आहे आणि केवळ विज्ञानच माणसाच्या विकासात मदत करू शकते. म्हणूनच, विद्यार्थ्यांना आत्मनिरीक्षण करण्यासाठी आणि वैज्ञानिक संस्कृती विकसित करण्यासाठी विज्ञान हा विषय आवश्यक आहे. घातांकीय उत्क्रांतीसाठी आपल्या सर्वांनी विज्ञान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. म्हणूनच प्रत्येकाला वैज्ञानिक ज्ञान उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे,” असे सीएसआयआर-एनआयओचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह म्हणतात.
महोत्सवाला उपस्थित असलेले मान्यवरांचे स्वागत विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी केले ज्यात त्यांनी नमूद केले की “आजचा दिवस अफाट आनंद आणि अपेक्षांचा दिवस आहे. आज आमचे माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची दुसरी पुण्यतिथी आहे आणि या महोत्सवाची संकल्पना त्यांनी केलि होती. आमचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या कार्यक्रमाचे मुख्य आश्रयदाता आहेत आणि या उपक्रमाला वाढण्यास आणि टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कोरोना महामारीमुळे आम्ही संपुर्ण महोत्सव सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व खबरदारी घेतली आहे. विज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी चित्रपट महत्त्वाचे आहेत आणि मला आशा आहे की आम्ही विज्ञानावर चित्रपट तयार करू आणि विज्ञान क्षेत्रातील आपल्या देशातील कामगिरी जगासमोर दाखवू.”
विज्ञान परिषद, गोवा ही स्वदेशी विज्ञान चळवळ आहे जी तिच्या मूळ संस्था विजनाना भारतीकडुन प्रेरणा घेते. विज्ञान आणि सिनेमाचा एकमेकांवर असलेल्या द्विपक्षीय प्रभावाचे कौतुक करण्याचा भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे.