विक्रमी विदेश दौऱ्यांबद्दल मोदींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करा:काँग्रेस

0
1004
गोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करून 52 देशांना भेटी देऊन केलेल्या विक्रमाची  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने  नोंद करावी,अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी गिनीज बुक कडे लेखी पत्र पाठवून केली आहे.
काँग्रेसच्या बंगळूरु येथील हितचिंतक माहिती हक्क कार्यकर्त्याने माहिती हक्का अंतर्गत मिळवलेल्या माहितीच्या आधारे आमोणकर यांनी गिनीज बुकच्या लंडन येथील कार्यालयाला लेखी पत्र पाठवून मोदी यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लवकरात लवकर नोंदवावे अशी मागणी केली आहे.
आमोणकर यांनी आपल्या पत्रात मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करून 52 देशांना भेटी दिल्या असून त्यासाठी 355 कोटी,30 लाख38 हजार 465 रुपये खर्च झाले असल्याचा उल्लेख केला आहे.मोदींच्या काळात रुपयाचे अवमूल्यन झाले असून मोदींची कामगिरी निराशाजनक असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.