विकास कामांची पोचपावती विजयाच्या रुपात मिळेल: श्रीपाद नाईक

0
803
गोवा खबर: उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीचा कार्यअहवाल प्रसिद्ध केला.4 वेळा खासदार,मंत्री म्हणून काम करताना जवळपास 1 हजार प्रकल्प पूर्ण करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला आहे.जनतेला आपले काम पसंत असून यावेळी देखील विकासकामांची पोचपावती विजया मधून मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
पणजी येथील भाजप मुख्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्रीपाद नाईक यांनी आपला कार्य अहवाल प्रसिद्ध केला.यावेळी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये,माजी आमदार दामू नाईक, अनिल होबळे,गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
नाईक म्हणाले,यावेळच्या खासदारकी मध्ये 2014 ते 2019 दरम्यान 322 प्रकल्प प्रस्तावित केले होते.त्यातील 217 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.38 प्रकल्प येत्या 2 महिन्यात पूर्ण होणार आहेत.उर्वरीत 67 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया सुरु झाली आहे.5 वर्षात 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता तो व्याज धरून 26.85 कोटी रुपये झाला होता.हा सगळा निधी खर्ची घालण्यात आला आहे.
13 विधानसभा मतदार संघात प्रचार पूर्ण झाला असून मतदारांचा मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे,असे नाईक यांनी यावेळी सांगितले.
खाण प्रश्न आम्ही सोडवणार आहोत याची खात्री खाण अवलंबीतांना असल्याने खाण अवलंबीतांची साथ आम्हाला मिळेल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
गोवा फॉरवर्डचे मंत्री आपण उमेदवारी अर्ज भरताना सोबत होते.मोठ्या सभांवेळी गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदार सोबत येऊन प्रचरात सहभागी होतील,अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 रोजी प्रचारासाठी गोव्यात येणार असून दोनापावल येथील श्यामाप्रसाद स्टेडियम मध्ये सायंकाळी त्यांची जाहीर सभा होईल असे नाईक यांनी सांगितले. याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह,नितिन गडकरी,स्मृती ईराणी आदी स्टार प्रचारक गोव्यात येणार असून लवकरच त्याचे वेळापत्रक बनवले जाईल असे यावेळी सांगण्यात आले.