वाहतूक नियमभंगात गोमंतकिय आघाडीवर,वर्षभरात 6 लाख वाहन चालकांना दंड

0
874

गोवा: वाहतुकीचे नियम मोडणे हा आमचा जन्मसिद्घ अधिकार असून तो आम्ही बजावणारच असच काहीस चित्र गोव्यात पहायला मिळत आहे.15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात तब्बल 12 लाखांच्यावर वाहने आहेत.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्धाटना वेळी दिलेल्या माहितीनुसार जवळपास अर्ध्या वाहन चालकांनी नियम भंग केला आहे.
वाढते अपघात लक्षात घेऊन पोलिसांनी वाहनचालकांवर लगाम कसण्याचा प्रयत्न केला असला तरी वाहन चालक त्याला अजीबात दाद देत नाही हेच या आकड़ेवारी वरुन दिसून येत आहे.
केवळ एका वर्षात वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी राज्यातील सुमारे 6 लाख वाहन चालंकाना दंड केल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दिली. वाहतूक खात्याने आयोजित केलेल्या 8 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या एकूण लोकांपैकी 6 लाख ही 50 टक्के संख्या असल्याचे ते म्हणाले. पैकी काहींना अनेकदा दंड होऊनही काही फरक पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.