वाहतुकीच्या नवीन नियमाची पाळीव कुत्र्यांनी देखील घेतली  धास्ती !

0
1568

 गोवा खबर:वाहतुकीच्या नवीन नियमांची आणि त्यासाठी आकरल्या जाणाऱ्या दंडाची धास्ती सगळ्यांनी घेतली आहे.गोव्यात तर आता स्कूटरच्या मागे बसून फेरफटका मारणारे कुत्रे देखील आता हेल्मेट घालून फिरताना दिसू लागले आहेत.

रस्त्यावर असणाऱ्या खड्डयाची धास्ती सगळ्यांनीच घेतली आहे. चांद्रयान -2 चा विषय ताजा असल्याने लोक आताच्या रस्त्यांची तुलना चंद्राच्या पृष्ठभागाशी करायला मागे पुढे पाहत नाहीत.
गोव्यात पाळीव कुत्र्याला घरातल्या माणसा सारखी वागणूक दिली जाते.कुत्रा हरवला तर जाहिरात दिली जाते.मेला तरी जाहिरात देवून सहवेदना देखील व्यक्त केली जाते.अशा प्रिय कूत्र्याला स्कूटरवर खड्डयानी भरलेल्या रस्त्यांवरुन नेताना कोणी धोका कसा पत्करु शकेल.
नव्या वाहतूक नियमात स्कूटरच्या मागे बसणाऱ्या कुत्र्याने देखील हेल्मेट घातले नाही तर दंड आकरण्याची तरतूद नसली तरी स्कूटरवर बसवून आपल्या कुत्र्याला हवा खायला नेणारे हे महाशय ऐकायला तयार नाहित.आता हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री नितीन गडक़री यांनी बघून नवीन नियम आणला तर मात्र बाकीच्यांची खैर नाही बर का!