वास्को-लोंढा रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रश्नावर लोक भावनांचा  सरकारने आदर राखावा : दिगंबर कामत 

0
511
गोवा खबर: लोकशाहीत लोकभावना व लोकांचे विचार यांना सर्वोच्च स्थान असते. वास्को- लोंढा रेल्वे दुपदरीकरणाने गोव्यातील महावीर अभयारण्य, पश्चिम घाटातील जैवविविधता यांना धोका उद्भवणार आहे. गोव्यातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नावर जनतेच्या भावनांचा आदर राखावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 
दक्षीण-पश्चिम रेल्वेकडुन वास्को- लोंढा रेलमार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या प्रस्तावास विरोध करणाऱ्या विवीध संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष ओर्विल दौरादो रोड्रिगीस यांनी आज दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

कृती दलाचे निवेदन अभ्यासपुर्ण असुन, सदर रेल मार्ग दुपदरीकरणाने गोव्यातील खेड्यातील राहणीमान, शेती, जीवसंपदा व प्राणी व लोकांचे आरोग्य याला कशी हानी पोहचु शकते याची अभ्यासपुर्ण माहिती देण्यात आल्याचे दिगंबर कामत यांनी सांगीतले. या प्रकल्पामुळे पश्चिम घाट व अभयारण्य क्षेत्राची जबर हानी होणार असल्याचे कामत म्हणाले.
सरकारने या प्रकल्पावर पुर्नविचार करावा व लोकभावनांचा आदर राखुन प्रकल्पा बद्दल फेरविचार करावा. कृती दलाला माझा संपुर्ण पाठींबा असेल असे कामत यांनी सांगीतले.
कासावली, माजोर्डा, दाबोळी तसेच हा रेल्वेमार्ग जात असलेल्या मतदारसंघातील स्थानीक आमदारानीही जनतेच्या भावना मुख्यमंत्र्या पर्यंत पोचवाव्यात अशी मागणी त्यानी केली आहे.