वास्को येथे 14 सप्टेंबर रोजी कोच डॅनियल वाझ यांचे व्याख्यान

0
1616

गोवा रिव्हर मॅरेथॉन 2019 चा काऊंट डाऊन सुरू

गोवा खबर:गोव्यातील वास्को येथे शनिवारी 14 सप्टेंबर रोजी प्रख्यात रनिंग कोच डॅनियल वाझ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रनिंग करणाऱ्या गोव्यातील समुदायाशी ते हॉटेल एचक्यू येथे सायंकाळी साडे सहा वाजता बोलणार आहेत.

खऱ्या अर्थाने गोवन असणाऱ्या मुंबईस्थित भारताच्या नाईके रनिंग क्लबचे कोच वाझ हे प्रमुख आहेत.
गोवा रिव्हर मॅरेथॉनचे (जीआरएम) 2019 आयोजक वास्को स्पोर्ट्स क्लब यांनी मंगळवारी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, हा उपक्रम म्हणजे चिखली येथे रविवारी 17 नोव्हेंबर 2019 रोजी होणाऱ्या गोवा रिव्हर मॅरेथॉन रेसचा प्रमोशनल रन अप असेल.

वास्को स्पोर्ट्स क्लबचे सचिव राकेश उनी म्हणाले, कोच वाझ यांचे व्याख्यान 14 सप्टेंबर रोजी फेसबुकवर सायंकाळी साडे सहा ते साडे सातच्या दरम्यान लाईव्ह असणार आहे. त्यामाध्यमातून रनर्स त्यांना प्रश्न विचारू शकतात. रनर्स त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मनातील शंका वाझ यांच्याशी बोलून सोडवू शकतात. बिगीनर्ससह पक्के रनर दोन्हीही यामध्ये सहभागी होऊ शकत असल्याचे उनी म्हणाले. ज्यांना या उपक्रमाला उपस्थित रहायचे आहे ते runnersingoa@gmail.com येथे त्यांच्या उपस्थितीबाबत कळवू शकतात.

प्रख्यात कोच वाझ यांनी 40 फुल मॅरेथॉन आणि दोन अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामध्ये बर्लिन, लौसाने, इस्तंबूल, वृझबर्ग आणि लोचनेस तसेच स्कॉटलंडमधील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा समावेश आहे.

कोच वाझ यांच्यासोबत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता स्पेशल मॅरेथॉन
चिखली पंचायतीपासून रविवारी 15 सप्टेंबर रोजी कोच वाझ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या मार्गावर धावणार असून यावेळी गोव्यातील रनर त्यांच्यासोबत धावू शकतात. यासाठीची पूर्वकल्पना इच्छुकांनी runnersingoa@gmail.com येथे द्यावी. हा रन सेल्फ सपोर्टेड असेल आणि धावणार्यांनी त्यांच्या स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या आणायच्या आहेत. पाणी उपलब्धीची सुविधा काही पाणी स्थळांवर केली जाईल.