वास्को-मिरज रेल्वे पुन्हा सुरु करा:तेंडुलकरांची राज्यसभेत मागणी

0
1990
गोवा खबर:गेल्या सात महिन्या पासून गोवा ते बेळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने गोवा आणि कर्नाटक मधील लोकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल होत आहे.सरकारने यात लक्ष घालून हा महामार्ग सुरु होई पर्यंत सध्या बंद असलेली वास्को ते मिरज ही रेल्वे सुरु करावी,अशी मागणी खासदार विनय तेंडुलकर यांनी आज राज्यसभेत केली.

पूर्वी वास्को ते मिरज अशी रेल्वे सुरु होती.गोवा ते बेळगाव महामार्ग बंद असल्याने दूध,भाज्या घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.गोवा,कर्नाटक आणि महाराष्ट्रा मधील लोकांचे हीत लक्षात घेऊन वास्को-मिरज रेल्वे सुरु करावी,अशी मागणी जोर धरु लागली होती.आज तेंडुलकर यांनी राज्यसभेत हा प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे.