वास्को न्यायालयाचे कामकाज दोन आठवड्यांसाठी बंद 

0
297

गोवा खबर:कोविड- १९ च्या उद्रेकामुळे वास्को येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातील कामकाज दोन आठवडे बंद राहणार आहे. परंतु अटकपूर्व अर्ज, जामीन अर्ज, इंजक्शन, स्थगिती यासारख्या तांतडीच्या अर्जांवर मडगांव जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या तळमजल्यावर असलेले न्यायिक अधिकारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुनावणी घेईल. वकिल आणि पक्षकारांनी या बदलाची नोंद घ्यावी.