वास्को-द-गामा ते बेळगावी विशेष रेल्वे 10 ऑगस्टपासून

0
1084

 गोवा खबर:प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने वास्को-द-गामा ते बेळगावी ही रेल्वे 10 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 तारखेला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवा सुरु करण्यात येईल.

वास्को-द-गामा ते बेळगावी ही द्वि साप्ताहिक रेल्वे तीन महिन्यांकरिता असेल. खानापूर, गुंजी, लोंडा, तिनईघाट, कॅसल रॉक, कुळे, सावर्डे, चांदर, मडगाव, कासावली आणि दाबोळी असा मार्ग असेल. या विशेष रेल्वेला सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे आठ डबे आणि सामान कम ब्रेक व्हॅन सुविधा असलेले दोन डबे असतील.