वाळपईत रोजगार उपलब्ध करून देणार:पर्रिकर

0
1073

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून वाळपई मतदारसंघात नवीन उद्योग येणार आहेत.त्यामध्यमातून इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.शिवाय विकस कामे करून आम्ही वाळपई मतदारसंघाचा विकास साधण्यास समर्थ असून मतदारांनी काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असे मताधिक्य द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज वाळपई येथे भाजप उमेदवार विश्वजीत राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत केले.
वाळपई येथील नवीन बस स्थानकाच्या सभागृहात झालेल्या सभेला राणे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाळपई मतदार संघातील अनेक विकस कामे आम्ही पूर्ण केली असून मतदार राणे यांना साथ देतील असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला. सार्वजनीक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार भक्कम करून विकसाच्या मार्गावर जाण्यासाठी राणे यांना निवडून द्या असे आवाहन केले. आजची उपस्थिती बघितली तर राणे आपल्या पेक्षा देखील जास्त मताधिक्य घेऊन निवडून येतील असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला. यावेळी राणे यांनी मतदारसंघात विकस कामे पूर्ण केली असून आठवी आणि दहावी पास तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असून आमच्या सरकार मार्फत आम्ही ती पूर्ण करणार आहोत.यावेळी सभेला वाळपई नगरपालिका मंडळ, जिल्हा पंचायत सदस्य,पंच सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते.प्रचार सभेच्या माध्यमातून राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.