वार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे आज उदघाटन

0
2233

 

 

गोवा खबर:केंद्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे 7 डिसेंबर 2018 रोजी आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू परिषदेत बीजभाषण करणार आहेत.

 

भारतात संशोधनासाठी जागतिक निधी वळवणे ही या परिषदेची संकल्पना आहे.  भारतीय स्टार्ट अप उद्योगाला जागतिक पातळीवरुन निधी वळवण्याची या परिषदेच्या निमित्ताने संधी आहे. परिषदेत सरकार आणि अनुभवी भांडवल व्यवस्थापक यांच्यात संवाद आणि चर्चा होणार आहे.

 

परिषदेत शासकीय अधिकारी, देशी आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप, जागतिक निधी व्यवस्थापक आणि धडाडीचे उद्योजक अशा 150 जणांचा सहभाग अपेक्षित आहे. अमेरिका, चीन, जपान, हाँगकाँग आणि सिंगापूर येथील 100 संस्थांचा या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग असणार आहे.

 

14, 000 स्टार्ट अपची नोंदणी झालेली भारत ही जगातील तिसरी मोठी स्टार्ट अप बाजारपेठ आहे. यापैकी 2018 या वर्षातच 8, 200 स्टार्ट अप्सची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून चालू वर्षात 89,000 नवीन रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे स्टार्ट अपमुळे झालेली एकूण रोजगारनिर्मिती 1,41,775 एवढी असेल.

 

गोवा सरकार राज्यात स्टार्ट अपचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहे. देशातील स्टार्ट अपसाठीचे सर्वात आघाडीचे केंद्र बनण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. 2025 पर्यंत स्टार्ट अपसाठी गोवा हे आशियातील आघाडीच्या 25 ठिकाणांमध्ये असेल यादृष्टीने वाटचाल सुरु आहे.