वार्षिक राष्ट्रीय लोकोत्सवाचे आयोजन

0
2097

गोवा खबर: कला व संस्कृती संचालनालयाने उदयपूर येथील पश्चिम विभागिय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने १० ते १९ जानेवारी २०२० पर्यंत कला अकादमी प्रकल्पातील दर्या संगम येथे राष्ट्रीय लोकेत्सव २०२० चे आयोजन केले आहे. या  उत्सवात भारतातील विविध राज्यातील मिळून सुमारे ५०० कलाकार भाग घेऊन आपल्या राज्यातील लोकनृत्ये आणि लोकसंस्कृती सादर करतील. भारतातील विविध राज्यातील सुमारे ६०० कारागिर आणि पारंपारिक खाद्य विक्रेते आपले स्टॉल्स उभारून आपल्या हस्तकला, हातमाग, पारंपरिक दागिने, पाक कृतीची या महोत्सवात विक्री करतील.

 यासाठी इच्छुक गोमंतकीय कारागिरांकडून तसेच स्वंय मदत गटाकडून लोकोत्सवात स्टॉल्स उभारण्यासाठी अर्ज मागविले आहेत. हस्तकला स्टॉल उभारणाऱ्या अर्जदारांसाठी सरकारने दिलेले कारागिर कार्ड आवश्यक आहे.

  स्टॉल्स उभारण्यासाठी गोमंतकीय स्वंयमदत गट, संस्था तसेच वैयक्तिकांकडूनही अर्ज मागविण्यात येत आहे.

 हस्तकला आणि पाकीट बंद खाध्यपदार्थ स्टॉल्स साठी प्रत्येकी ४ हजार रूपये शुल्क आणि गोमंतकीय खाध्यपदार्थाच्या स्टॉल्ससाठी ८ हजार रूपये शुल्क आणि हे शुल्क स्टॉल्स वितरीत करताना भरावे लागेल.

      कला व संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन पाटो येथे १६ ते १८ डिसेंबर पर्यंत मर्यादित प्रमाणात अर्ज उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम पाधान्य दिले जाईल. हस्तकला अर्जासाठी कारागिर कार्ड सोबत आणावे. पूर्ण भरलेले अर्ज २४ डिसेंबरपूर्वी सादर करावे. उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. हे अर्ज नमुने केवळ गोमंतकीय हस्तकला आणि खाद्यपदार्थ स्टॉल विक्रेत्यांसाठी आहेत. इतर राज्यांतील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.