वानरमारे समाजासाठी मदतीचा ओघ सुरु

0
389
गोवा खबर:फोंडा तालुक्यातील बेतोडा-निरंकाल येथील वानरमारे समाजाची लॉक डाउनच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून समाजसेवी संस्था आणि व्यक्तीकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.किराणा मालासह जीवनावश्यक वस्तू आणि तयार जेवण घेऊन अनेक जण या समाजाच्या वाडयावर येऊन मदत करत माणूसकीचे दर्शन घडवत आहेत.
बेतोडा-निरंकाल येथे गेली कित्येक वर्षे वानरमारी समाज वास्तव्य करून आहे.रोजंदारीची काम करून या समाजातील मंडळी आपला उदरनिर्वाह करत असतात.कोरोना फैलावू नये म्हणून देशात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाले होते.त्यामुळे सुरूवातीच्या दिवसात त्यांना आहे त्यात दिवस काढावे लागले होते.त्यांच्याकडे असलेले अन्नधान्य संपल्याचे समजताच त्यांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावाले.
आज कळंगुट येथून डॉ. अपर्णा पालयेकर यांच्या नेतृत्वाखाली ज्योती शिरोडकर,पारेख शिरोडकर,सबिता
वालावलकर,वर्षा गोसावी,जस्टिन फर्नांडिस,डॉ. माधवी कामत,डॉ. विद्या चित्रे,स्वेटा तार,संजय पालयेकर आदींनी वानरमारी समाजातील लोकांना पंधरा ते वीस दिवस पुरेल इतके जीवनावश्यक सामान पोचवून आणखी मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.गावणे येथील युवकांनी पुलाव आणि बिस्किटांचे वाटप करून मदत केली. वानरमारी समाजाने मदती बद्दल सर्वांचे आभार मानले.