गोवाखबर:आयनॉक्ससह गोव्यातील इतर चित्रपटगृहांमध्ये वादग्रस्त पद्मावत चित्रपटाचे शो आज पासून सुरु झाले आहेत.देशभरात होत असलेला विरोध लक्षात घेऊन चित्रपटगृहां बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधामुळे चित्रपटगृह संघटनेने सुरूवातीला पद्मावत दाखवण्यास नकार दिला होता मात्र फोंडा आणि वास्को येथील 2 चित्रपटगृहांमध्येच पद्मावत सुरुवातीला प्रदर्शित झाला होता.आता आयनॉक्ससह सर्व चित्रपटगृहांमध्ये वादग्रस्त ठरलेला पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
