वाढदिवसा दिवशी मुख्यमंत्र्यांनी आझिलो मध्ये बजावली वैद्यकीय सेवा

0
864
गोवा खबर:राज्यात कोरोना विरुद्धची लढाई सुरु असताना डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज म्हापसा येथील आझिलो इस्पितळात जाऊन एक दिवसाची सेवा बजावत आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.याच हॉस्पिटल मध्ये पूर्वी ते वैद्यकीय सेवा बजावत होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आज वाढदिवस आहे.कोरोनाचे संकट असल्याने त्यांनी आपण वाढदिवस साजरा करणार नाही,असे पूर्वीच जाहीर केले होते.वाढदिवसा निमित्त वर्तमानपत्रां मध्ये जाहिराती देण्यापेक्षा कोविड फंडात निधी जमा करा,असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले होते.

कोरोनाचे संकट निर्माण झाल्या नंतर पूर्वी वैद्यकीय पेशात असलेले काही सेलिब्रिटी पुन्हा वैद्यकीय सेवेत रुजू झाल्याच्या बातम्या सगळीकडे झळकत होत्या.त्यात आज गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भर पडली.
 आज वाढदिवसाचे अौचित्य साधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा म्हापसा येथील आझिलो हॉस्पिटल गाठून आपली वैद्यकीय सेवा बजावली. हॉस्पिटल मधील रुग्ण तपसल्या नंतर त्यांनी हॉस्पिटल मध्ये फेरफटका मारून तेथे एडमिट असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच जनतेने स्वतःहून सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्री म्हणाले,कोविड विरोधात लढणाऱ्या डॉक्टरांवर होत असलेले हल्ले ही गंभीर बाब आहे.असे प्रकार घडणे योग्य नाही.केंद्र सरकारने त्याची दखल घेत केलेल्या कडक शिक्षेमुळे आता त्याला आळा बसेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.कोरोना विरोधात लढा देणाऱ्या डॉक्टरांना समर्थन देण्यासाठीच आपण आज आज वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला असे सांगताना कोरोना हरेगा, देश जीतेगा,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.