लोहियां सोबत मिनेझिस यांचा धडा शालेय अभ्यासक्रमात घ्या:शिवसेनेची मागणी

0
1108
गोवाखबर:डॉ राममनोहर लोहियांच्या बरोबरीने गोव्याचे सुपुत्र डॉ जुलियाव मिनेझीस यांचाही उल्लेख जरूरी असुन गोवा शालांत मंडळाने त्यांचा धडा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून घ्यावा अशी  आग्रही मागणी शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे. १८ जून क्रांती दिनाच्या निमित्ताने आझाद मैदान येथे हुतात्मा स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शिवसेना कार्यालयात आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. १८ जून १९८६ च्या क्रांतीत डॉ. जुलियाव मिनेझीस यांचाही वाटा तेवढाच महत्वाचा अाहे. लाहोर कैदेतून सुटका झाल्यानंतर डॉ. लोहिया यांना डॉ. जुलियाव यांनी गोव्यात येण्याचे आमंत्रण दिले. दोघानाही देशाबद्दल नितांत प्रेम होते आणि परकीय सत्तधाऱ्यांचा तिरस्कार ते करत होते असे सांगून कामत म्हणाले, शिवसेना त्यांच्या पोर्तुगीज सरकाराच्या विरोधात केलेल्या यशस्वी क्रांतीला सलाम करत आहे.यावेळी सरचिटणीस मिलींद गावस, सचिव वंदना लोबो, मंदार पार्सेकर,   श्रेहा धारगळकर, नियोजन विभाग प्रमुख फेलीक्स डायस, युवा विभाग संघटक चेतन पेडणेकर, मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो, सचिव इरफान खान, अमोल प्रभुगावकर, कळंगुट विभाग प्रमुख एंन्थनी फर्नांडिस, सुरज वेर्णेकर प्रामुख्याने हजर होते.