लोकोत्सवाच्या माध्यमातून परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न- श्रीपाद नाईक

0
1124

गोवा खबर:लोकोत्सवच्या माध्यमातून परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. लोकोत्सव म्हणजे संस्काराचे मंथन असल्याचे ते म्हणाले. अमोना-पैंगीण, काणकोण येथे आज त्यांच्या हस्ते लोकोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

लोकोत्सवासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवकांना रोजगाराची संधी निर्माण होते. लोकोत्सवामुळे चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळत असून त्यानिमित्ताने पारंपरिक जीवनशैली जोपासली जाते, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

आज बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पारंपरिक जीवनशैली आरोग्यदायी असल्याचे ते म्हणाले. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी अनेकविध योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

नाबार्डच्या जनरल मॅनेजर श्रीमती कामाक्षी पै यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. ग्रामीण भागासाठी नाबार्डच्या योजनांची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.