लोकायुक्तांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचाराचे संरक्षण करतेय सरकारः आप 

0
283
गोवा खबर:लोकायुक्तांनी घोटाळ्यांची मालिकाच उघडकीस आणली आहे. सरकारने अद्याप यावर कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे कोणाच्या हिताचे रक्षण केले जात आहे असल्याचे स्पष्ट होत आहे.भाजप सरकार एक प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणीच घालत आहे,असा आरोप आप नेते राहुल म्हांबरे यांनी केले आहे.

सरकारच्या निष्क्रियतेमुळे लोकायुक्त इतके निराश झाले आहेत की त्यांनी आपले घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मायकल लोबोंवरील लोकायुक्तांच्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. लोकायुक्तांनी आपल्या निवेदनात लोबो मंत्री म्हणून अयोग्य आहेत असा ठपका लावला असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी यावर चुप्पी साधली असल्या बद्दल म्हांबरे यांनी नाराजी व्यक्त केली.
लोबो यांनी लोकायुक्तांच्या टीकेवर लोकायुक्त कोण आहेत असा प्रतिप्रश्न केला आहे. हे सर्व आदेश अस्पष्ट तक्रारीवर देण्यात आलेले आहेत ,असा आरोप लोबो यांनी लोकायुक्तांवर केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी आता मौन सोडून यावर बोलण्याची गरज आहे,असे म्हांबरे म्हणाले.
 लोबो यांच्याकडे लोकायुक्तांच्या हेतूंवर प्रतिप्रश्न करण्याचे धैर्य आहे कारण त्यांना माहित आहे की भाजप सरकार त्यांच्या संरक्षणासाठी सर्व काही करेल,असे सांगून म्हांबरे म्हणाले, सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांनी लेबर गेटपासून बीच क्लिनिंग घोटाळ्यापर्यंत सुरू असलेल्या अनेक घोटाळ्यांच्या विरोधात आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री सावंत त्यावर कारवाईची करण्याची गरज आहे. लोबो यांच्या क्षमतेबाबत लोकायुक्तांनी केलेल्या टीकेकडे मुख्यमंत्री करत असलेले दुर्लक्ष बरेच काही सांगून जाते,असेही म्हांबरे म्हणाले.