लोकांना संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत बाहेर फिरण्यास बंदी

0
333

लॉकडाऊन काळ आणि सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा बैठकीत आढावा

गोवा खबर:लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या लोकांना आपल्या गावात जाण्यासाठी खास रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर गृह मंत्रालयांच्या मार्गदर्शक नियमाप्रमाणे कोणते उपाय घेण्याची गरज आहे याविषयी आज बैठकीत चर्चा झाली. बैठकीत कायदा आणि सुव्यवस्था, ट्रकांची वाहतूक, मदत कार्य आणि राहण्याची व्यवस्था आणि कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतला. लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यानी वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक नियमांवर बैठकित चर्चा झाली.

नवीन मार्गदर्शक नियमाप्रमाणे अत्यावश्यक सेवा सोडून लोकांना संध्या ७ ते सकाळी ७ या  कालावधीत बाहेर फिरण्यास बंदी असेल. दारू विक्रीची दुकाने संध्या ६ वाजता बंद होतील ज्यामुळे अशा दुकानामध्ये काम करणा-या कामगारांना संध्या ७ वाजण्यापूर्वी आपल्या घरी पोचता येईल. तसेच अशा दुकानाच्या मालकांनी सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे पालन केले पाहिजे.

बाजार संध्या ६ वाजता बंद होतील आणि सकाळी ८ वाजल्यानंतर खुले होतील. अत्यावश्यक सेवेसाठी हा नियम लागू राहणार नाही. लोकांनी सामाजिक अंतर, मास्काचा वापर, सॅनिटायजर हॅडवॉशचा वापर आणि इतर सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे.

नोडल अधिकारी श्री. कुणाल यांनी बाहेरील राज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी सुरू केलेल्या उपायांची माहिती दिली. अशा कामगारांची पंचायतीत नोंदणी चालू असून आतापर्यंत ३० हजार कामगारांनी नोंदणी केली आहे आणि ९० टक्के कामगारांनी आपल्या घरी जाण्याची इच्छा प्रकट केली आहे अशी माहिती पंचायत संचालकांनी दिली आहे.

सध्या राज्यात आदरातिथ्य सेवा बंद असल्याने विजेचा वापर कमी झाल्य़ाची माहिती मुख्य वीज अभियंत्याने दिली. स्वस्त धान्य दुकानामधून रेशन वितरण सेवा व्यवस्थित चालू असल्याची माहिती नागरीपूरवठा सेवा सचिवानी दिली. उध्यापासून कदंब बस मधून धान्य वितरण बंद करण्याचा खात्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. चालू असलेली बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यास संबंधित यंत्रणाना आदेश देण्यात येतील.

राज्यातील आठ क्वॉरंटाईन सुविधा केंद्रानी मिळून २८० जणांना क्वॉरंटाईन केले आहे अशी माहिती नोडल अधिका-यांनी दिली.

राज्यात जी एसटी कमी गोळा झाल्याची आणि केंद्राकडून वेळेत भरपाई मिळविण्यास अडचण होईल. येणा-या महिन्यात निधीची कमतरता भासेल अशी माहिती वित्त सचिवांनी दिली.

कदंब बस वाहतूक सेवा, भात पिकांची कापणी, भाज्याची लागवड, चेकनाक्यांवरून होणारी वाहतूक आणि इतर संबंधित विषयांवर बैठकीत चर्चा झाली.