लोकांना रोख आर्थिक मदतीची गरज , व्हर्चुअल रॅलीनी त्यांचे समाधान होणार नाही : कामत 

0
801
गोवा खबर: केंद्र व राज्यातील भाजप सरकारची चुकीच्या धोरणांमुळे आज गोव्याच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना लाॅकडाऊनमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सरकारकडुन आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक मदतीची वाट पाहत आहे. भाजप सरकारने केवळ घोषणा व रॅली आयोजित करुन उत्सव साजरे न करता लोकांना रोख मदत देण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी विरोधी पक्ष नेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केली आहे. 
काँग्रेस पक्षाच्या “स्पीक अप इंडिया” मोहिमेने गोव्यातील नेटवर्क सेवेचा बोजवारा उडाल्याचे उघड झाले होते. सरकारने आता गोव्यातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यावर भर द्यावा जेणेकरुन त्याचा फायदा लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना ॲानलाईन शिक्षणासाठी मिळेल असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

भाजपने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपुर्ती निमीत्त व्हर्चुअल रॅली आयोजित करून उत्सव साजरा करण्याच्या केलेल्या घोषणेचे काॅंग्रेस पक्षाच्यी पाचही आमदारानी निषेध करणारे एक संयुक्त पत्रक जारी केले आहे.
 काँग्रेस पक्षाने मागीतलेली १०० कोटींची पॅकेज सरकारने ताबडतोब अमलात आणावी व घोर संकटात सापडलेल्या गोमंतकीयांना दिलासा द्यावा अशी मागणी पाचही आमदारानी केली आहे.
माजी मुख्यमंत्री व पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी सरकारने या संकटकाळात शेतकरी व बागायतदारांना त्वरीत मदत करण्याची मागणी केली आहे. सरकारने विधानसभेचे खास अधिवेशन घ्यावे व कोविड संकटावर सर्व आमदारांना सत्य परिस्थीतीची माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री व फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी लोकांना दिलासा मिळेल अशी योजना व काम सरकारने हाती घेणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. सरकारने जबाबदारीने वागणे व लोकांना आत्मविश्वास देणे गरजेचे असुन, मोटार सायकल पायलट, टॅक्सीवाले, गाडा व्यापारी व सामान्य माणसांना आज सर्वाधीक झळ बसल्याचे त्यानी सांगीतले .
नावेलीचे आमदार व माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो यांनी राज्याची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी त्वरीत पाऊले उचलावीत अशी मागणी केली आहे. गोव्यातील वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवीण्यासाठी चाचणी क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे सांगुन, उत्सव साजरे करण्याची ही वेळ नव्हे असे प्रतिपादन फालेरो यांनी केले.
गोव्याबाहेरवतसेच विदेशात अडकुन पडलेल्या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी सरकारने त्वरीत पाऊले उचलणे महत्वाचे आहे.  गोव्यात येणारे गोमंतकीय खलाशी व गोवेकर बांधव यांना अजुनही भाजप सरकारकडुन सापत्नभावाची वागणुक मिळत आहे. त्यांना सन्मानाने वागवणे सरकारचे कर्तव्य आहे. कोविडसाठी चाचणी क्षमता वाढवणे व विलगीकरणांची सुविधा गोमंतकीयांना मोफत देणे सरकारचे कर्तव्य असल्याचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लाॅरेन्सो यांनी सांगीतले.