लोकांना आर्थिक मदतीची गरज, मोदींच्या पत्राची नव्हे: सुभाष फळदेसाई

0
801
गोवा खबर: आज संपुर्ण गोवा कोरोना संकटात सापडला आहे. मागील दोन महिन्यात लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गोमंतकीयांना आज आर्थिक मदतीची गरज आहे. मोदींच्या जुमला पत्राने त्यांचे पोट भरणार नाही. भाजप सरकार दीवाळखोरीत गेल्याचे सर्वांनाच माहित असुन, सरकारातील मंत्री, आमदार व भाजप पदाधिकाऱ्यानी अनेक घोटाळे करुन जमवलेल्या संपत्तीतील काही वाटा आता जनतेल्या द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी केली आहे. 
काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयातुन व्हिडीयोद्वारे त्यांनी पत्रकारांना संबोधन केले. यावेळी त्यांच्या समवेत दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस तसेच मडगाव गट काँग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक हजर होते.
भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील वर्षपूर्ती निमीत्त काल पत्रकार परिषद घेऊन भाजपचे कार्यकर्ते दोन लाख घरात मोदींचे पत्र वितरीत करणार असल्याची घोषणा केली होती त्याचा काँग्रेस पक्षाने तिव्र निषेध केला आहे. सामान्य गोवेकरांना आर्थीक संकटात लोटलेल्या भाजप सरकारने उत्सव साजरे न करता, लोकांना संवेदना दाखवुन आर्थीक मदत द्यावी अशी मागणी फळदेसाई यांनी केली आहे.
भाजपने काल जाहिर केलेल्या डिजीटल संपर्क अभियानाची खिल्ली उडविताना फळदेसाई यांनी काँग्रेस पक्षाने आठ दिवसांमागे घेतलेल्या ‘स्पीक इंडिया’ मोहिमेत गोव्यात इंटरनेट नेटवर्क सेवेचा बोजवारा उडाल्याचे उघडकीस आणले होते. त्यामुळे डिजीटल अभियाना ऐवजी गोव्यातील नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी फळदेसाई यांनी केली आहे.
भाजपचे केंद्र सरकार व राज्य सरकार आज दीवाळखोर झाले आहे. देशाला व राज्याला त्यानी आर्थिक संकटात लोटले आहे. गोवा सरकारने मागीतलेले दोन हजार कोटींचे पॅकेज सोडाच, राज्याचा अधिकाराचा जिएसटीचा वाट देण्यासही केंद्र सरकार टाळाटाळ करीत आहे,असा आरोप फळदेसाई यांनी केला.
काँग्रेसचे राष्ट्रिय नेते राहुल गांधी यांनी सुरवातीपासुन सामाजीक कोविड चाचणी हाती घेण्याची सातत्याने मागणी केली होती. आज त्यांचे म्हणणे ऐकले असते तर मांगोर हिलची वेळ आली नसती असे ज्यो डायस यांनी सांगीतले.