लोकसभे बरोबर जाहीर होणार गोव्याच्या पोटनिवडणुका?

0
948
गोवा खबर:केंद्रीय निवडणूक आयोग आज सायंकाळी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे.त्याचवेळी गोव्यातील म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर होणार आहेत.या पोटनिवडणुका लोकसभे बरोबर एकाच वेळी होतात की स्वतंत्रपणे होणार हाच औत्सुक्याचा भाग आहे.
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांची पत्रकार परिषद साडे पाच वाजता होणार असून त्यात गोवा विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपताच ही पत्रकार परिषद होणार आहे.

मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदार संघाचे आमदार असलेल्या दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केल्याने दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत.
म्हापसा मतदारसंघाचे आमदार असलेले फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघां बरोबर म्हापसा विधानसभा मतदार संघात देखील पोटनिवडणुक होणार आहे.या पोटनिवडणुका लोकसभे बरोबर होतात की स्वतंत्रपणे होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.