लोकसभा २०१९: कुडतरी मतदारसंघात सावईकर यांनी साधला मतदारांशी संवाद

0
752
 गोवा खबर:भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी घोगळ हौसिंग बोर्ड येथील सिद्धिविनायक आणी ज्योतीबा मंदिरात श्री चे दर्शन घेऊन कुडतरी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे.प्रचाराचा जाहीरनाम्यात साधन साधन सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असून पर्यटन क्षेत्र तसेच खाण धोरणाच्या मुद्यावर आधारित भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे अशी माहिती नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे.
सावईकर यांनी घोगळ हौसिंगबोर्ड येथील आपल्या कार्यकर्त्यां सह सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले त्यांनंतर त्यांनी ज्योतीबा मंदिराला भेट देऊन सांगणे करून घेतले व प्रचाराला सुरुवात केली.मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपण प्रचाराला सुरुवात केली होती.सध्या दक्षिण गोव्यातील नऊ मतदारसंघात प्रचाराची फेरी पूर्ण केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.सर्व मतदारसंघातुन चांगला प्रतिसाद आपणाला मिळत आहे असे ते म्हणाले.
खाण व्यवसयाबद्धल त्यांना विचारले असता लोकांना सत्य परिस्थिती माहिती आहेसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गोव्यातील खाणी बंद पडलेल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयात खाण संदर्भातील सुनावणी प्रलंबित असून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केले आहे.आता सर्वोच्च न्यायालय कोणती भूमिका घेणार यावर सरकारची पुढील कृती अवलंबून आहे अशी माहिती सावईकर यांनी दिली. केंद्र सरकारने खास करून दक्षिण गोव्यात विकासकामे राबवली आहेत.या कामांच्या पाठबळावर भाजपचे दोन्ही खासदर पुन्हा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता पर्यंत एकूण नऊ मतदारसंघात प्रचाराची फेरी पूर्ण झाली आहे.लोकांना दारोदारी भेट देऊन प्रचार करण्यात येत असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती त्यांनी दिली.जहिरनाम्यावर खास समिती अभ्यास करत आहे.साधन सिविधा आणि विकासकामांना जाहीरनाम्यात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच पर्यटन व्यवसाय,शैक्षणिक क्षेत्र,खनिज व्यवसाय,खाण अवलंबितांचे विषय या सर्वांना डोळ्यासमोर ठेऊन जाहीरनामा तैयार केला जाणार आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती सावईकर यांनी दिली.