लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल रोजी 

0
730


 

गोवा खबर:लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल 2019 ला होणार आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी 91जागांवर या दिवशी मतदान होणार आहे.

आंध्र प्रदेश (25), अरुणाचल प्रदेश (2), मेघालय (2), उत्तराखंड (5), मिझोराम (1), नागालॅण्ड (1), सिक्कीम (1), लक्षद्वीप (1),अंदमान निकोबार बेटे (1) आणि तेलंगणा (17) इथल्या सर्व लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातल्या 48 पैकी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधल्या 5, बिहारमधल्या 4, छत्तीसगडमधल्या 1, जम्मू-काश्मीरमधल्या 2,मणिपूरमधल्या 1, ओदिशामधल्या 4, त्रिपुरामधल्या 1, उत्तर प्रदेशातल्या 8 आणि पश्चिम बंगालमधल्या 2 जागांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंतचे मतदान 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी होणार आहे.17 व्या लोकसभेसाठी मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.