लोकशाही प्रस्थापित करण्याचे कार्य युवकांनी करावे : अखिलेश यादव

0
351
गोवा खबर:  भाजप सरकारने लोकशाहीची गळचेपी केली असुन, लोकाभिमूख प्रशासनासाठी लोकशाही मूल्ये पाळणे गरजेचे आहे. युवक कॉंग्रेसने आता लोकशाही बळकट करण्यासाठी वावरावे असे अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव अखिल यादव यांनी म्हटले आहे.
हळदोणा युवक कॉंग्रेसतर्फे आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पुर्ण जोमाने काम करु कॉंग्रेस पक्षाला सत्तेत आणण्याचे आवाहन केले. या बैठकीत अखिल भारतीय युवा कांग्रेस सचिव अखिलेश यादव,गोवा काॅंग्रेस माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, गोवा काॅंग्रेस युवाध्यक्ष वरद मार्दोळकर, हळदोणा कॉंग्रेसचे गट अध्यक्ष आश्विन डिसोजा, उत्तर गोवा युवक कॉंग्रेस अध्यक्ष विवेक डिसील्वा, उत्तर गोवा युवक कॉंग्रेस सचिव यश कोचरेकर, सांतआंद्रेचे साईश आरोसकर तसेच नव नियूक्त हळदोणा युवक कॉंग्रेस अध्यक्ष विठ्ठल आरोंदेकर, युवा नेता महाबळेश्वर तोरस्कर व इतर उपस्थित होते.
भाजप हा सत्तेसाठी हपापला असुन, सरळ मार्गे सत्ता स्थापन करता येत नसल्याने लोकशाहीचा गट घोटून मागील दाराने सत्तेत येण्याचे काम भाजपने केले आहे. पक्षांतराला प्रोत्साहन देवून भाजप युवकांसमोर चुकीचे उदाहरण ठेवत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत लोकांनी भाजपला पराभुत करून धडा शिकवावा असे अखिलेश यादव म्हणाले.
प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी बोलताना भाजप सरकार प्रत्येक महिन्यात कर्ज काढून आपला कारभार हाकत असल्याचे सांगितले व गोवा राज्याला भाजपने दिवाळखोर केल्याचा आरोप केला.
गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी यावेळी बोलताना लोकशाही सांभाळण्यासाठी युवकांनी आता पुढे येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.महाबळेश्वर तोरस्कर यांनी आभार प्रदर्शन केले.
या बैठकीला असंख्य युवक कॉंग्रेस कार्यकर्ते, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. कॉंग्रेस पक्ष बांधणीसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.