लोकविरोधी भाजप सरकार आता शेतकरीच उलथून टाकतील : सरदेसाई 

0
501
गोवा खबर : शेतकऱ्यांच्या या राष्ट्रव्यापी आंदोलनाने या लोकविरोधी भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड लोकमत तयार केले असून 1974 साली रेल्वे आंदोलनाने जसे पूर्ण बहुमतात असलेले केंद्र सरकार पाडले होते तसेच हे आंदोलन करेल असा विश्वास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला.
भारत बंदाचा एक भाग म्हणून  अखिल भारतीय किसान सभा, आयटक आणि सिटू या कामगार संघटनांनी पणजीच्या आझाद मैदानावर आयोजित केलेल्या धरण्यात आज सरदेसाई यांनी भाग घेतला. यावेळी त्यांच्या बरोबर कामगार फॉरवर्ड विभागाचे अध्यक्ष जॉन नाझारेत तसेच पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत हे उपस्थित होते.
गोव्यासाठी या भारत बंदचे औचित्य खास असून गोव्यातील सरकारही केंद्र सरकारप्रमाणे आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर लोकांच्या ग्राह्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता आम्हाला गोवा राखून ठेवण्यासाठी आमचे युवक आणि शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात पुढे येण्याची गरज व्यक्त केली.