लोकमान्य टिळकांचा हेतूतः ‘दहशतवादाचे जनक’ म्हणून उल्लेख करणार्‍यांवर त्वरित कारवाई करा आणि संबंधित पुस्तक मागे घ्या !

0
1053
जोधपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. छगनलाल गोयल यांना निवेदन देतांना डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. हनुमान विष्णोई, सनातन संस्थेच्या पू. सुशीलाजी मोदी आणि अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित

राजस्थानातील आठवीच्या पुस्तकात लोटिळकांचा घोर अवमानसमितीचा आंदोलनाचा इशारा

 गोवा खबर:राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचादहशतवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहेहिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहेभारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व बलीदान करणार्‍या लोटिळकांचा अवमान आम्ही कदापी खपवून घेणार नाही.राज्यस्थान शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेख तात्काळ वगळावातसेच हा प्रकार नजरचुकीने झालेला नसून राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यासाठी हेतूतः लोकमान्य टिळकांचा असा उल्लेख करण्यात आला आहेअसा उल्लेख करणारे लेखकते छापणारे मुद्रकप्रकाशक आणि संबंधित दोषी शासकीय अधिकार्‍यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी,संबंधित पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि संबंधितांनी याविषयी जाहीर क्षमायाचना करावीअन्यथा या विरोधात हिंदु जनजागृती समिती देशभरात आंदोलन छेडेलअसा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिला आहे.

    या संदर्भात राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधराराजे सिंधीया यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच जोधपूर आणि जयपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

   या आधीही केंद्रशासनाच्या आयसीईएसच्या पाठ्यपुस्तकातून बाळ गंगाधर टिळकलाला लजपतरायबिपीनचंद्र पाल,भगतसिंगसुखदेव आणि राजगुरु आदी थोर स्वातंत्र्यसैनिकांचा आतंकवादी’ म्हणून जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आला होता.त्याला विरोध झाल्यावर तत्कालीन शासनाने तो भाग पुस्तकातून वगळला होताआता पुन्हा टिळकांना आतंकवादी ठरवणेहे राष्ट्र्रपुरुषांना अवमानित करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे मोठे षड्यंत्र आहेस्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन जनतेने स्वातंत्र्य लढ्यात उतरावे म्हणून लोकमान्य टिळक यांनी आपल्या ओजस्वी वाणीने भारतीय जनतेत स्वातंत्र्याचे स्फुलिंग तेजवलेजनता स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर झालीत्यामुळे इंग्रजांनी टिळकांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ अर्थात् भारतीय असंतोषाचे जनकम्हणून विशेषण दिलेअसे असतांना टिळक यांना दहशतवादाचे जनक’ (फादर ऑफ टेररिझमम्हणणेहे देशद्रोही कृत्यच म्हणावे लागेल, असे शिंदे यांचे म्हणणे आहे.