लॉकडाऊन काळातील पगाराचा प्रश्न मालक आणि कामगारांनी तडजोडीने सोडवावा

0
294

 गोवा खबर:सरकारने व्यापारी अस्थापन आणि दुकान मालक आणि कामगारांना लॉकडाऊन काळातील पगार देण्यासाठी त्यांच्या प्रश्नावर वाटघाटी आणि तोडगा काढण्याचे सांगितले. जर त्याना लॉकडाऊन काळातील पगारासंबंधिचे प्रश्न स्वता सोडविता येत नसल्यास त्यांनी ते सोडविण्यासाठी कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालय किंवा कामगार खात्याच्या संबंधित उपकार्यालयात संपर्क साधावा.

      भारत सरकारच्या गृह व्यवहार मंत्रालयाने २९ मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार व्यापारी अस्थापन आणि दुकान मालकांना आपल्या कामगारांचा पगार न कापण्याचा आदेश दिला होता.

      या आदेशाला अनेक मालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ४ जून २०२० रोजी न्यायालयाने अंतरिम आदेशाव्दारे लॉकडाऊन काळातील पगार आपल्या कामगारांना देण्यासंबंधीच्या प्रश्नांबाबतीत मालकाआड कोणतीही जबरदस्तीची कारवाई करण्यास मनाई केली आहे.

      तद्नंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या १२ जून रोजीच्या अंतरिम आदेशाव्दारे जे मालक आणि कामगार लॉकडाऊन काळातील पगारासंबंधिचे प्रश्न तडजोडीने सोडविण्यास इच्छुक आहेत त्यांनी ते सोडविण्याची बोलणी करावी असे निर्देश दिले आहेत. असे प्रश्न जर त्यांना स्वता सोडविता येत नसेल तर त्यांनी संबंधित अधिकारिणीकडे विनंती करावी.