लेह, लडाखमध्ये उद्यापासून ‘आदि महोत्सव’

0
793

 

 

 

 गोवा खबर:लेह, लडाखमध्ये उद्यापासून आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी कल्याण मंत्रालय आणि आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेल्ड) यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

17 ते 25 ऑगस्टपर्यंत हा महोत्सव चालणार असून जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते उद्या या महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग आणि ट्रायफेल्डचे अध्यक्ष आर.सी.मीना यावेळी उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून 20 हून अधिक राज्यातून सुमारे 160 आदिवासी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.