लुपिनच्या कमवा आणि शिका उपक्रमातील तिसऱ्या बॅचची सांगता

0
2193
गोवा खबर:लुपिनच्या वतीने २०११ साली कमवा आणि शिका हा उपक्रम सुरू करण्यात आला. यंदा या उपक्रमाअंतर्गत तिसऱ्या बॅचचे विद्यार्थी पदवीधारक झाले आहेत. कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेतील समस्येवर मात करण्यासाठी २०१० साली या उपक्रमाची संकल्पना तयार करण्यात आली. दरवर्षी लुपिनच्या वतीने कामाचा अनुभव नसलेले व नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या हजारो पदवीधारकांची निवड केली जात असते. या अनुभवातून अशा पदवीधारकांना नोकरीसाठी सक्षम बनवण्यासाठी योग्य तांत्रिक व जीवनावश्यक कौशल्य देण्याची गरज पुढे आली. त्यातूनच भारतातील औषधनिर्माण क्षेत्रासाठी आवश्यक अशा कुशल, सक्षम तरुण मनुष्यबळाचा विकास करण्याच्या उद्देशाने कमवा आणि शिका उपक्रमाचा उद्देश निश्चित झाला. औषधनिर्माण क्षेत्रासाठी लुपिनने राबवलेला हा एक प्रमुख व अनोखा उपक्रम ठरला असून सर्वच घटकांसाठी तो लाभदायक ठरत आहे.
लुपिनचे प्रकल्प तारापूर किंवा गोव्यामध्ये स्थित आहेत, मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम आणि गोवा अशा विविध राज्यांतील अंतर्गत प्रदेशांमध्ये वर्तमानपत्रांतून जाहिराती, महाविद्यालयांमध्ये माहिती उपक्रम, भित्तिपत्रके व हस्तपुस्तिका त्याचबरोबर विविध कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून माहिती देत या उपक्रमाची माहिती प्रसारित करण्यात आली. ही राज्ये लुपिनच्या सर्वांत मोठ्या उत्पादन केंद्रांच्या आसपासचा प्रदेश आहे: तारापूर, गोवा, सिक्कीम, इंदूर आणि औरंगाबाद.
१२वी विज्ञान शाखेमध्ये किमान ५०% गुण प्राप्त केलेल्या, कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताची असलेल्या, औषधनिर्माण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या तीन वर्षीय शैक्षणिक उपक्रमामध्ये या विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती क्षेत्रातील विविध कामे, कौशल्यांबाबत शिक्षण, प्रशिक्षण व अनुभव दिला जातो. या कालावधीत या उमेदवारांना काम केल्याबाबत मानधन (स्टायपेंड) तसेच शिक्षण दिले जाते तसेच सवलतीच्या दरात निवास, वाहतूक व भोजन व्यवस्था प्रकल्प परिसरात उपलब्ध केली जाते. या शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातील पाच दिवस ऑन-दॉ-जॉब प्रशिक्षण दिले जाते आणि एक दिवस क्लासरूम शिक्षण दिले जाते. तसेच या विद्यार्थ्यांना वर्तणूक व व्यक्तिमत्त्व विकास कौशल्यांबाबतही प्रशिक्षण दिले जाते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि भीमराव आंबेडकर विद्यापीठ अशा मुक्त विद्यापीठांच्या सहकार्याने या उपक्रमासाठीचा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. हा तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅचलर्स डिग्री इन फिजिकल केमिस्ट्री एज्युकेशन बी. व्होकेशन इन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) ही पदवी बहाल केली जाते.
२०११ साली या शैक्षणिक उपक्रमास सुरवात केल्यानंतर २०१४ साली गोव्यामध्ये अखिल भारतीय शिकाऊ पदवीधारकांचे संमेल गोव्यात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास गोवा, तारापूर, इंदूर आणि औरंगाबाद येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राबरोबरच नोकरीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर या उपक्रमातील दुसरी बॅच २०१३ साली सुरू होती २०१६ साली, तर तिसरी बॅच २०१५ साली सुरू होऊन २०१८ साली उत्तीर्ण झाली आहे.
२०१८ साली या शैक्षणिक उपक्रमाचे नामकरण बॅचलर्स डिग्री इन फिजिकल केमिस्ट्री एज्युकेशन बी. व्होकेशन इन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) असे करण्यात आले. २०११ पासून एकूण ५६० विद्यार्थ्यांना लुपिनने कमवा आणि शिका उपक्रमाचा लाभ दिला असून, यातील १८१ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहे