
गोवा खबर: मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत यानी लिखाण करण्याअगोदर पत्रकाराना सत्यता पडताळण्याचा सल्ला दिला. एखाद्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खूप कालावधि लागतो परंतु ती खराब करण्यास वेळ लागत नाही . संवेदनशील प्रकरणे नोंदविताना पत्रकारांच्या निकषांचे पालन करण्याचा सल्लाही त्यानी पत्रकाराना दिला.
गोवा संपादक मंडळ, गोवा पत्रकार संघ, गोवा छायापत्रकार संघटना, इलेक्ट्रोनिक मिडिया, पत्रकार संघटना, क्रीडा पत्रकार संघटना, गक्षिण गोवा पत्रकार संघटना, यांच्या सहकार्याने माहिती खात्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकारिता दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत यानी राज्यात विकास कामे हाती घेण्यासाठी व गुंतवणुकीस आकर्षित करण्यास सरकारची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडियाने सहकार्य देण्याचे सांगितले. राज्याच्या हितासाठी संतुलित दृष्य लोकासमोर ठेवले पाहिजे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना श्री सावंत यानी राष्ट्रीय पातळीबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही सरकारच्या योजनांचा, धोरणांचा तसेच कार्यक्रमांचा प्रसार करण्यासाठी माहिती खात्याने जबाबदारी पेलण्याचे सांगितले सदर खाते ही जबाबदारी पेलणार असे ते म्हणाले. पत्रकार बांधवाना राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून श्री सावंत यानी माहिती खात्याचा दृष्टिकोन आणि संपर्क बदलत असल्याचे सांगितले. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदर खाते प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
माहिती खात्याच्या संचालिका श्रीमती मेघना शेटगांवकर यानी उपस्थितांचे स्वागत करून मिडिया आणि लोकामधील दरी मिटविण्याची महत्वाची भुमिका प्रसार माध्यम बजावते असे सांगून प्रत्रकारांच्या कल्याणासाठी माहिती खात्यामार्फत अमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी माहिती खात्याचे सचिव श्री संजय कुमार, आएएस, विविध प्रसार माध्यमांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि इतर पत्रकार उपस्थित होते.
‘’रिपोर्टिंग इंटरप्रिटेशन: अ जरनी.’’ या विषयावर गट चर्चा झाली त्यात प्रसिध्द पत्रकार श्री राजेश मेनन, श्री अँश्ली रोझारियो, श्रीमती पामेला डिमेलो, श्री किशोर नाईक गांवकर भाग घेतला. श्री प्रमोद आचार्य या चर्चेचे मोडरेटर होते.
ज्येष्ठ पत्रकार श्री अँलिस्टर मिरांडा, श्री महेश दिवेकर, श्री गणादिप शेल्डेकर यांचा यावेळी मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत यांच्याहस्ते त्यानी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्द्ल सत्कार करण्यात आला. याशिवाय विविध पुरस्कार आणि माहिती खात्याने घेतलेल्या छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्याना बक्षिसे वितरीत करण्यात आली. पत्रकारितेतील आजिवन कार्याबद्द्ल पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात येणारा पुरस्कार प्रसिध्द पत्रकार, लेखक श्री लँम्बर्ट मास्कारेन्हास याना देण्यात .
उत्कृष्ठ संपादक पुरस्कार श्री परेश प्रभू याना, क्रिडा लेखन श्री मार्कुस मेरगुलाव, उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार श्री राजतिलक नाईक याना, कला व संस्कृती रिपोर्टिंगचा उत्कृष्ठ पुरस्कार गौरी मळकर्णेकर याना तर श्री रोहन श्रीवास्तव याना आरोग्य आणि स्वच्छता लिखाणासाठी, निबेदिता सेन याना ग्रामिण पत्रकारीतेचा पुरस्कार प्रदान आला.
माजी मुख्यमंत्री स्व. श्री मनोहर पर्रीकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रावर आधारित माहिती खात्याने छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन केले होते . श्री राजतिलक नाईक याना पहिले, श्री गणेश शेटकर आणि कैलास नाईक याना दुसरे व तिसरे बक्षिस प्राप्त झाले. श्री सगुण गावडे, श्री प्रसाद शिरोडकर, श्री आतिश नाईक, श्री अमेय नाईक, आणि श्री उपेंद्र नाईक याना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली.
गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजनेखाली आयोजित केलेल्या गोव्यातील नवीन पर्यटक स्थळांचा शोध विषयावरील छायाचित्राचे पहिले बक्षिस श्री राजतिलक नाईक याना तर श्री उपेंद्र नाईक याना दुसरे, श्री गणेश शेटकर याना तिसरे बक्षिस प्राप्त झाले. श्री मनिष चोपडेकर, श्री वैभव भगत, श्रीमती स्नेहा लोटलीकर, श्री सगुण गावडे आणि श्रीमती भारती नाईक याना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली.
नवप्रभाचे संपादक श्री परेश प्रभू यानी आभार मानले. माहिती खात्याचे माहिती सहाय्यक श्री साम गांवकर यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.