लाडली लक्ष्मी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ

0
326

                                    

गोवा खबर: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर २२ मार्च ते ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने महिला आणि बाल विकास संचालनालयात लाडली लक्ष्मीचे अर्ज स्वीकारले जात नव्हते. अनेक अर्जदारांचे लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ मार्च ते ३ मे या कालावधीत होती ते अर्ज त्याना लॉकडाऊनमुळे सादर करता आले नाहीत. त्यामुळे लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज सादर करण्याच्या मुदतीत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.