“लाईफलाईन उडान” विमानांद्वारे देशभरात 161 टन मालवाहतूक

0
563


 

 गोवा खबर:लाईफलाईन उडान अंतर्गत, एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ, पवन हंस आणि खासगी वाहकांद्वारे 116 उड्डाणे चालविली गेली आहेत. यातील 79 विमान उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअरने केली आहेत. आत्तापर्यंत 161 टन मालवाहतूक झाली आहे.

आजपर्यंत लाईफलाईन उडान विमानाद्वारे कापलेले हवाई अंतर 112,178 किमीपेक्षा जास्त आहे.

आंतरराष्ट्रीय आघाडीवर नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाने तातडीच्या वैद्यकीय पुरवठा हस्तांतरणासाठी दोन्ही देशांदरम्यान सतत मालवाहू हवाई वाहतूकीसाठी सेतूसदृष स्थिती स्थापित करण्यासाठी चीनसोबत काम केले आहे.

भारत आणि चीन दरम्यान पहिले मालवाहू उड्डाण 4 एप्रिल 2020 रोजी झाले ज्यावेळी  एअर इंडियाने चीनकडून 21 टन तातडीची वैद्यकीय मदत आणली. कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या लढ्याला  पाठिंबा देण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय सामुग्री देशाच्या दुर्गम भागात नेण्यासाठी ‘लाइफलाईन उडान’ उड्डाणे  नागरी हवाई वाहतूक मंत्रालयामार्फत चालविली जात आहेत.

लाईफलाईन उडान विमानांचे तारखेनुसार ब्रेकअप खालीलप्रमाणे आहे.

ईशान्य प्रदेश (एनईआर), बेट प्रांत आणि डोंगराळ राज्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.

लडाख, दिमापूर, इंफाळ, गुवाहाटी आणि पोर्ट ब्लेअर या शेवटच्या टप्प्यातील मालवाहतुकीसाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर इंडिया आणि आयएएफने परस्पर सहयोग केला आहे.

कार्गोच्या बऱ्याच भागामध्ये वजनाने हलके मास्क, हातमोजे आणि इतर उपभोग्य वस्तूंसारख्या विपुल उत्पादनांचा समावेश असतो, ज्यासाठी विमानात प्रति टन अधिक जागेची आवश्यकता असते. योग्य काळजी घेऊन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी आणि डोक्यावरील केबिनमध्ये माल ठेवण्यासाठी खास परवानगी घेण्यात आली आहे. विमानतळापर्यंतच्या मालवाहतुकीत लक्षणीय तार्किक आव्हानांचा मुकाबला करीत विमानचालन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लाईफलाईन उडान उड्डाणे सुरु आहेत.

लाइफलाइन उडान विमानासंदर्भातील सार्वजनिक माहिती लाइफलाइन उडान वेबसाइटवर दररोज अपलोड केली जाते. लाइफलाइन उडान विमानांसंबंधी समन्वय साधण्यासाठी एक पोर्टल राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांनी विकसित केले आहे. लाइफलाइन उडान पोर्टलची लिंक  नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  www.civilaedia.gov.in  उपलब्ध आहे).

देशांतर्गत विमानवाहतूक करणाऱ्या स्पाईसजेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो कंपन्या व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक करीत आहेत. स्पाइसजेटने 24 मार्च ते 4  एप्रिल २०२० या कालावधीत 2,23,241 कि.मी. अंतरावर 1,327 टन मालवाहतूक केली. यापैकी 46 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्लू डार्टने 25  मार्च ते 4  एप्रिल २०२० दरम्यान  50,086 कि.मी.चे अंतर पार करून 52  देशांतर्गत मालवाहतूक उड्डाणे केली असून 761 टन मालवाहतूक केली आहे. इंडिगोने 8 मालवाहू विमानांद्वारे 3-4 एप्रिल  2020 दरम्यान 6,103 कि.मी.चे अंतर पार करून 3 टन मालवाहतूक केली आहे. यात शासनासाठी विनाशुल्क वैद्यकीय पुरवठा समाविष्ट आहे.