“लस सुरक्षा” द्या, त्यानंतर इयत्ता बारावीची “परीक्षा” घ्या : आप

0
128
गोवा खबर : आम आदमी पक्षाने इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षांविषयी दृढ आणि वेळेवर निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजपा सरकारला केली आहे. निर्णयामध्ये निश्चितता नसल्यामुळे अनेक तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
सुमारे २० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याची माहिती देताना आप सहसंयोजक अ‍ॅड. प्रतिमा कुतींन्हो यांनी सीएम प्रमोद सावंत यांना सल्ला दिला की, विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यास गोवा त्वरित व सुरक्षितपणे बोर्ड परीक्षा घेऊ शकतो.
कुतींन्हो यांनी खालील मुदतीसह २-महिन्यांची योजना सुचविली :
१) जूनच्या पहिल्या आठवड्यात पहिला डोस
२) सहा आठवड्यांनंतर जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात दुसरा डोस
३) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित विषयांवर बोर्डाची परीक्षा, तीही सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करुन.
शासनाकडे जवळपास अडीच लाख लसींचा साठा असल्याने, कुतीन्हो म्हणाल्या की, या महत्त्वाच्या व
कामासाठी ४०,००० पेक्षा कमी लसी देण्यास अडचण नसायला पाहिजे.
कुतींन्हो म्हणाल्या की, बहुतेक बारावीचे विद्यार्थी १८ वर्षे वयाचे आहेत, तसेच गोवा बोर्ड संबंधित लसीकरण तज्ञांकडून लस घेण्यास पात्र वयापासून काही महिन्यांपेक्षा लहान असलेल्यांना लस देण्यासंबंधी परवानगी मागू शकते, अशी सूचना केली.
कुतींन्हो म्हणाल्या की, इयत्ता बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा असल्याने, पुढील प्रवेशासाठी महत्त्वाचे निकष असणारे विषयच परीक्षेत समाविष्ट केले जावेत.
यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास वेळ व निश्चितता मिळेल, या उद्देशाने तातडीने ही योजना जाहीर करण्याचे आवाहन कुतींन्हो यांनी मुख्यमंत्र्यांना केले. कौटिन्हो पुढे म्हणाल्या की, दुसऱ्या लाटेने आधीच प्रभावित झालेल्या तरुणांना आणि तिसर्‍या लाटेमुळे प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या तरुणांना, या योजनेमुळे सुरक्षितपणे परीक्षा घेण्याच्या फायद्या बरोबरच संरक्षण मिळेल.
अनिश्चिततेमुळे आलेल्या मानसिक तणावामुळे बऱ्याच पीडित तरुणांनी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधला असल्याची माहिती कुतीन्हो यांनी दिली.
सीबीएसईसारख्या केंद्रीय बोर्डासाठी आणि एनईईटी आणि जेईई सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठीचा निर्णय केंद्र सरकार घेवू शकते, असे सांगून कुतींन्हो यांनी शिक्षण मंत्री असणाऱ्या सावंत यांना गोवा बोर्डासाठी त्वरित निर्णय घेण्याचा सल्ला दिला.