लष्कराच्या ताब्यात असलेली जागा पर्रिकरांनी परत का नाही घेतली:काँग्रेसचा सवाल

0
877
काँग्रेसने आज पुन्हा एकदा मनोहर पर्रिकर यांनी 23 वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व करून देखील इथल्या मूलभूत समस्या सोडवू शकले नसल्याचा आरोप करत विधानसभा निवडणुकीत जे मांद्रे मतदारसंघात झाले त्याची पुनरावृत्ती पणजीत होईल असा आशावाद व्यक्त केला.
काँग्रेस हाउस मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते यतीश नाईक यांनी पर्रिकर यांच्या अपयशाचा पाढा वाचला.पर्रिकर विरोधात असताना लष्कराच्या ताब्यातील जागा परत मिळावी यासाठी आवाज उठावत होते.मात्र स्वतः संरक्षणमंत्री होऊन देखील त्यांना पणजी मधील जागा लष्कराकडून परत घेणे का शक्य झाले नाही याचे उत्तर यावेळी त्यांना पणजीवासियांना द्यावेच लागेल असे नाईक म्हणाले.
पर्रिकर यांनी 23 वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले तरी पणजी दरवर्षी पावसाळ्यात पणजी तुंबते,कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून ती सोडवणे का शक्य झाले नाही असे प्रश्न नाईक यांनी उपस्थित केले.पणजी स्मार्ट सिटी करण्याच्या बाता केल्या जात असल्या तरी पणजीत धड़ रस्ते नाहीत,पार्किंगची सोय नाही,पिण्याचे पाणी 24 तास मिळत नाही,साधन सुविधा उभारायला जागा नाही या समस्या पर्रिकर सोडवू शकले नसल्याने मतदार यावेळी त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असे नाईक म्हणाले.