लघु व मध्यम उद्योगांसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेची ९ जुलै रोजी बैठक

0
1183

 

 गोवा खबर:भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक समावेशन आणि विकास विभागाने राज्यातील लघु व मध्यम उद्योगांसंदर्भात ९ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. लघु व मध्यम उद्योगांसदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच बँकींग सुविधांबाबत उद्योजकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि गोव्यासाठीचे प्रादेशिक संचालक डॉ एस राजगोपाल बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

बैठकीला बँकांचे प्रतिनिधी, एमएसएमई-डीआय, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, वेर्णा औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन आणि लघु व मध्यम उद्योगांसंदर्भातील इतर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.