लक्षणविरहित कोविड रूग्णांसाठी एसओपी

0
360

गोवा खबर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अत्यंत सौम्य, पूर्व लक्षणात्मक/लक्षणविरहीत कोविड रूग्णांसाठी घरीच अलगीकरणात राहण्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

कोणत्याही लक्षणविरहीत व्यक्तीला घरीच अलगीकरणात राहावयाचे आहे अशा व्यक्तींनी जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिका-यांकडे कार्यालयाच्या ई-मेल आयडीवरून परवानगी घ्यावी तसेच स्वंय अलगीकरणासाठी अंडरटेकिंग द्यावे लागेल. अंडरटेकिंगसह सादर केलेल्या अर्जाची पावती जिल्हाधिका-यांमार्फत ज्या हद्दीत ती व्यक्ती राहते त्या संबंधित वैध्यकिय अधिका-यांकडे सादर केली जाईल.

वैध्यकिय अधिका-यांमार्फत त्या व्यक्तीचा आरोग्याचा दर्जा निश्चित केला जाईल आणि ती व्यक्ती घरीच अलगीकरणासाठी पात्र असल्यास शिफारसीसह अर्ज जिल्हाधिका-यांकडे परत देण्यात येईल.

वैध्यकिय अधिका-यांकडून शिफारस पत्र घेतल्यानंतर घरीच अलगीकरणासाठी उपजिल्हाधिका-यांकडून परवानगी देण्यात येईल.  आरोग्य खात्याच्या सल्ल्यानुसार  मात्र त्या व्यक्तिने स्थानिक आरोग्य अधिका-यांला आरोग्यासंबंधीची माहिती वेळोवेळी द्यावी लागेल.

संबंधित पंचायत/ नगरपालिकेला ही परवानगी कळविली जाईल. या पोचपावतीनुसार ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेतर्फे कुटुंब घरी अलगीकरणात आहे असे नमुद केलेला स्टिकर घराला चिकटवतील.

घरी अलगीकरणात असलेल्या व्यक्तींचा वेगळा रजिस्टर प्रत्येक उपजिल्हाधिका-य़ांनी ठेवावा.

घरी अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची माहिती तालुकावार जिल्हाधिका-यांकडे संबंधित वॉट्सअपवरून संध्या ४ वाजेपर्यंत सादर करावी.

घरी अलगीकरणाची देखरेख केली जात आहे हे निश्चित करण्यासाठी सहजगत्या तपासणी केली पाहिजे. ग्रामपंचायतीने किंवा नगरपालिकेने घरी अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची देखरेख केली पाहिजे तसेच ती व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब घरी अलगीकरणाच्या नियमांचे पालन करते की नाही याची खात्री करून घ्यावी.