रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरण देऊ नका आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करा

0
991

डिचोली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागण्या

डिचोली – भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे, विस्थापित रोहिंग्या हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करून जातीय तणाव निर्माण करणार्‍या भारतीय मुसलमानांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करावे, या मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता. आंदोलनात १४ हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या, तर एकूण ५०० हिंदूंनी उपस्थिती लाभली. भाजपचे डिचोली येथील आमदार श्री. राजेश पाटणेकर हेही आंदोलनात सहभागी झाले होते.
शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे          गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. आमदार श्री. राजेश पाटणेकर म्हणाले, ‘रोहिंग्यांच्या समर्थनार्थ डिचोली येथे झालेल्या फेरीमध्ये आपण सहभागी झालो होते. यामुळे सर्वत्र आपल्यावर टीकेची झोड उडाली. आपली चूक मांडण्यास राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे व्यासपीठ आपणास मिळाले.’ यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनांतून पुढील सूर उमटला. म्यानमारमधील हिंसाचारामुळे निवार्सित रोहिंग्या हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारत शासनाने या संदर्भात त्वरित आपली भूमिका जाहीर करावी. म्यानमार आणि तेथून बांगलादेश येथे विस्थापित झालेल्या रोहिंग्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. हिंदु आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करणार्‍या, हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना नमाज पढण्यासाठी सक्ती करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये. जम्मूमध्ये उभारण्यात आलेल्या रोहिंग्यांच्या वसाहतींवर कारवाई करावी ज्या ज्या संघटना, व्यक्ती अथवा धार्मिक नेते रोहिंग्यांची बाजू घेत आहेत, त्यांच्यावरही देशद्रोह्यांचे समर्थक म्हणून कठोर कारवायी करण्यात यावी. रोहिंग्या हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या, म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांबद्दल सहानुभूती दाखवणार्‍या भारतीय मुसलमानांना वा तथाकथित निधर्मीवाद्यांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये. शेवटी श्री. जयेश थळी यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. राहुल वझे यांनी केले.
आंदोलनात सहभागी संघटना – जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई; पंतजली योग समिती आणि भारत स्वाभिमान; स्वराज्य संघटना म्हापसा आणि मडगाव, वीर सावरकर युवा मंच; हिंदवी स्वराज्य मडगाव; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शिव कृपानंद स्वामी संप्रदाय; मये ग्रामरक्षा दल; शिवसेना; हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; रणरागिणी; गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ
आंदोलनातील वक्ते – सर्वश्री विश्‍वराज सावंत, शिवप्रेमी संघटना; रमेश नाईक, माजी गोवा राज्यप्रमुख, शिवसेना; किशोर राव, उत्तर गोवा राज्यप्रमुख, शिवसेना; समीर गावस, हिंदु स्वराज्य संघटना; जयेश नाईक, हिंदवी स्वराज्य संघटना; भारत गुळण्णवर, भारत स्वाभिमान; उल्हास शेट्ये, छत्रपती शिवाजी महाराज संघटना, मुरगाव, सौ. सिद्धी प्रभु, आस्था बिगर शासकीय संस्था आणि ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे