रोटरी क्लब तर्फे ‘रोटरी युथ लिडरशिप ऍवार्ड’

0
801

गोवा खबर:रोटरी क्लब तर्फे ‘रोटरी युथ लिडरशिप ऍवार्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत काल राज्यातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी चाणाक्या नितीवर मार्गदर्शन करण्यात आले होते. यासाठी ‘उडान’ या संघटनेचे राजेश कामत यांनी विद्यार्थ्यांना चाणाक्या नितीवर मार्गदर्शन केले.

रोटरी क्लबने 1959 साली ‘रोटरी युथ लिडरशिप ऍवार्ड हा ऑस्ट्रलिया मध्ये सुरु करण्यात आला. आज जगभर रोटरी क्लबच्या संस्था आहे. जगभर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांना चाणाक्या निती कळावा तसे त्यांना या समाजामध्ये चाणाक्या प्रमाणे वागता यावे, त्यांचे विचार त्यांची बुद्धी वाढावी यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातात, असे यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष शांतदु मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रोटरी क्लब युवकांसाठी जगभर काम करत आहे. वयोगट 14 ते 18 तसेच 19 ते 30 अशा दोन गटामध्ये युवकांना मार्गदर्शन केले जाते, असे यावेळी रोटर क्लबच्या प्रतीमा धोंड यांनी सांगितले. यावेळी इब्राहीम हारुण उपस्थित हाते. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने कॉलेज विद्यार्थी सहभागी झाले होते.