रोजच्या हेल्थ बुलेटिनमध्ये रूग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती द्यावी, लोकांना मदत करण्यासाठी मजबूत रिअल टाईम हॉस्पिटल माहिती यंत्रणा विकसित करा : राहुल म्हांबरे यांची मुख्यमंत्री सी. सावंत यांच्याकडे मागणी

0
167
गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज आरोग्य मंत्र्यांकडे आरोग्य बुलेटिनच्या माध्यमातून कोविड रूग्णांसाठी खाजगी व सार्वजनिक रूग्णांलयांमध्ये बेडची असलेली उपलब्धता सार्वजनिक करावी कारण वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या व बेड संबंधीच्या तक्रारी लक्षात घेऊन बेडच्या संख्येत वाढ करावी.
आपच्या गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, लोकांच्या आरोग्याची चिंता करण्याऐवजी आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी बैठक घेऊन सद्यस्थितीबाबत काम करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना  मात्र म्हापुसा आणि मार्गोआतील उमेदवारांच्या राजकारणाबद्दल अधिक रस होता.
गोव्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत ते म्हणाले की, “लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे ,लोकांनी मास्कचा वापर करावा तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भाषणाच्या बैठकांना जाण्याचे टाळावे, कारण आता फक्त देवच गोव्याला वाचवू शकतो”
मुख्यमंत्र्यांनी दररोज वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा, रेमडॅझिव्हिर आणि कोविड लसींची उपलब्धता याविषयीची माहिती जाहीर करावी, अशी मागणी राहुल म्हाम्बरे यांनी केली आणि सद्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी द्रव्य ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून दिल्याबद्दल केरळ सरकारचे आभार मानले.
महाराष्ट्राने, गोव्याला कोविडचे संवेदनशील उत्पत्ती केंद्र म्हणून घोषित केले असले तरीही गोव्याचे मुख्यमंत्री गोव्यात येणाऱ्या लोकांकडून कोविड बाधित नसल्याच्या प्रमाणपत्राचा आग्रह धरत नाहीत. गोव्याची परिस्थिती अन्य राज्यांशी तुलनेत योग्य नाही कारण इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांवर योग्य तो अंकुश राज्यसरकार ठेवण्यात अपयशी ठरले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.