रोईण अळंबीचे जतन करण्याचे गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे लोकांना आवाहन

0
621

 

गोवा खबर:गोवा राज्य जैवविविधता मंडळाने वन्य अळंबी म्हणजे रोईण अळंबीचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी अळंबी तोडणे व विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. जंगलात पावसाळ्यात विविध जातीची अळंबी उगविली जातात अशी अळंबी मोठ्याप्रमाणात तोडल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो त्याचप्रमाणे वारूळावरील अळंबी तोडल्याने वाळवीच्या अळ्यानाही धोका निर्माण होतो. अळंब्यांची पूर्ण वाढ न होता तोडल्याने अनेक प्रजाती नष्ट होतात.

खाजगी वन मालकानाही अळंब्यांच्या जातीचे संरक्षण करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात अळंबी तोडल्याने माकड तापासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो.

     पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अळंबीची महत्वाची भुमिका असते.