रॉयल एनफिल्ड रायडर मॅनिया २०१९

0
1333

 

मोटरसायकलिंग, संगीत आणि मेट्सच्या अॅक्‍शनने भरलेल्‍या तीन दिवसांचा गोव्यात समारोप

गोवा खबर:रायडर मॅनिया या जगभरातील रॉयल एनफिल्डचे रायडर्स आणि उत्साहींचे ११वे वार्षिक स्नेहसंमेलन २२ नोव्हेंबर २०१९ रोजी गोव्यात सुरू झाले आणि ते २४ नोव्हेंबर २०१९ रोजी संपले. या तीन दिवसांमध्ये सुमारे ८००० रॉयल एनफिल्डचे रायडर्स जगभरातून सहभागी झाले आणि त्यांनी रोमांचक मोटरसायकलिंग स्पर्धा आणि प्रयोगात्मक उपक्रमांचा अनुभव घेतला आणि देशातील काही सर्वोत्तम कलाकारांच्‍या संगीताचा आनंदही त्यांनी घेतला.

या महोत्सवाच्या सर्वांत महत्त्वाच्या वैशिष्टयांपैकी एक म्हणजे रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनोद दसरी यांच्या हस्ते हिमालयन फ्लॅट ट्रॅकर एफटी४११ चे अनावरण आणि स्लाइड स्कूलचे उद्घाटन होते. स्लाइड स्कूलचे उद्दिष्ट तज्ञांसाठी फ्लॅट ट्रॅक रेसिंगसाठी तज्ञ आणि नवीन लोकांचा सहजसाध्य प्रवेश शक्य करणे आणि भारतात फ्लॅट ट्रॅक रेसिंगच्या मजेची तसेच सहभागाची संस्कृती पुनरूज्जीवित करणे हे होते. स्लाइड स्कूलच्या पहिल्या वर्षाला जानेवारी २०२० मध्ये बंगळुरू येथील बिग रॉक डर्ट पार्कमध्ये सुरूवात होईल. स्लाइड स्कूलच्या अनावरणाच्या वेळी रॉयल एनफिल्डने कस्टम बांधणी असलेल्या हिमालयन फ्लॅट ट्रॅक (हिमालयन एफटी४११) मोटरसायकलचे प्रदर्शनही केले. तिची बांधणी एसअँडएस सायकल्स, यूएसएच्या भागीदारीत करण्यात आली आहे. स्लाइड स्कूलसाठी नोंदणी करणाऱ्या रायडर्सना विशेषतः सपाट रस्त्यांवर चालवण्यासाठी बनवण्यात आलेली हिमालयन एफटी ही गाडी चालवता येईल. सपाट रस्त्यासाठी तयार असलेल्या हिमालयन एफटीच्या पहिल्या डेमो रनचे उद्घाटन रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनोद दसरी यांनी केले.

हिमालयन ओडिसी २०१९ दरम्यान सुरू झालेला शाश्वततेच्या दिशेने चाललेला प्रवास कायम सुरू ठेवताना रायडर मॅनियाने शून्य सिंगल यूज प्लास्टिकचा संदेश कायम दिला. सर्व नोंदणीकृत सहभागींना सिंगल यूज प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर बंद करून शाश्वत पर्यावरणाच्या बांधणीसाठी योगदान देण्याच्या दृष्टीने धातूच्या बाटल्या देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या गेल्या नाहीत. त्याऐवजी वॉटर स्टेशन्सची उभारणी रायडर मॅनियाच्या ठिकाणी करण्यात आली होती. #LeaveEveryPlaceBetter उपक्रमांतर्गत यावर्षी रॉयल एनफिल्डने स्क्रॅप या कार्यालये तसेच कार्यक्रमांच्या ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन शाश्वत पद्धतीने करण्यास मदत करणाऱ्या कचरा व्यवस्थापन सामाजिक उपक्रमासोबत भागीदारी केली. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरणावरील परिणाम कमी करून शून्य कचरा कार्यक्रमासाठी काम करण्याचे आणि कचऱ्याच्या वर्गीकरणावर, वागणुकीतील बदलांवर, रिसायकलिंग आणि कंपोस्ट यांच्यावर लक्ष देण्याचे होते. याद्वारे या टीमला निर्माण करण्यात आलेल्या कचऱ्यापैकी ८५ टक्के कचरा स्थानिक भूभरावापासून दूर नेणे शक्य झाले. तीन दिवस संपल्यावर ३००० पेक्षा अधिक रिसायकलयोग्य कचरा (मुख्यत्वे काच) आणि ४५० किलोपेक्षा अधिक जैवविघटनक्षम कचरा कार्यक्रमाच्या ठिकाणाहून उचलून रिसायकल करण्यासाठी नेण्यात आला.

रायडर मॅनियातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे डर्ट ट्रॅक इव्हेंट होता. त्यात सर्व वर्गातील पूर्वीच्या आणि विद्यमान पोडियम होल्डर्सनी रेस ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अटीतटीची झुंज दिली. प्रचंड स्पर्धा झाल्यावर आर्ट ऑफ मोटरसायकलिंगचे मोहम्मद झहीर विजेते ठरले. यावर्षी सहभागी होणाऱ्या प्रसारमाध्यमांसाठी एक विशेष रेस आयोजित करण्यात आली होती आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.

रायडर मॅनियाच्या चाहत्यांना प्लँक रेस कॉम्पिटिशन, एस दि हिल, मोटोबॉल आणि रिंग टॉस अशा विविध मोटरसायकलिंग खेळांचा तसेच मजेच्या उपक्रमांचा आनंद घेता आला. रोजच्या रोज परिक्रमा, नॅश जेआर, ड्युएलिस्ट इन्क्वायरी बँड, दि लोकल ट्रेन, एव्हियल, अग्नी, डीजे एसए आणि फ्रेंड्स अशा ब्रँड्सच्या तालावर मोटरसायकल स्वारांनी ताल धरला.

रॉयल एनफिल्डने आपली २०० लिमिटेड एडिशन पिनस्ट्रिप हेल्मेट्स रायडर मॅनियादरम्यान बाजारात आणली. मद्रास स्ट्रिप्स या नावाच्या शतकापूर्वीच्या पिनस्ट्रिप्सने सज्ज असलेली ही हेल्मेट्स मालकाला एक वेगळी ओळख देतात. चाहते आणि रॉयल एनफिल्डचे रायडर्स ही खास हेल्मेट्स लवकरच खास store.royalenfield.com येथून मर्यादित कालावधीसाठी खरेदी करू शकतात.