रेस्टॉरंट उघडताना बार बंद ठेवण्यात काय तर्क आहे?: आपचा सरकारला सवाल

0
664
गोवा खबर:8 तारखेपासून रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी देताना राज्यातली बार खुले करण्यास नाकारून कोविडला दूर ठेवण्याचा हेतू कसा साधला जाईल हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने सरकारकडे केली आहे.
 आपचे गोवा सरचिटणीस प्रदीप पाडगावकर म्हणाले की बार उद्योगधंद्यावर लॉकडाउन बंदीमुळे परिणाम झाला आहे.  सरकारने आधीच घाऊक दारूची दुकाने उघडली होती आणि आता रेस्टॉरंट्स सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे बार वगळण्यामागील तर्क समजत नाही.
“बार आणि ताव्हॅर्न हे पारंपारिक व्यवसाय आहेत. घाऊक दुकानातून दारू विक्रीस परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय आणि आता रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी देणे हा बार मालक तसेच बार ग्राहकांवरही अन्याय आहे. बार बंद ठेवण्यास समर्थन करणारा काही तज्ञ अभ्यास सरकारने केला आहे का? की नेहमीप्रमाणे हे राज्य सरकार केंद्राचे प्यादे असल्याने एसओपीची वाट पहात आहे? ” असा प्रश्न करुन बार मालकांना योग्य वागणूक मिळावी, अशी मागणी पाडगावकर यांनी केली.