रेल्वे प्रवास करताना प्रवाशांचा ओळखपत्राचा पुरावा म्हणून डिजिटल लॉकरमधील डिजिटल आधार आणि वाहन परवान्याला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

0
1228

गोवा खबर:रेल्वे प्रवास करताना डिजिटल लॉकर खात्याने दिलेले आधार आणि वाहन परवाना हे ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकाराला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, आधार किंवा वाहन परवाना प्रवाशाच्या डिजी लॉकर खात्यात लॉगीन करून ‘इशूड डॉक्युमेंट’ मधील असायला हवा तरच तो वैध मानला जाईल. प्रवाशाने डिजी लॉकरवर स्वत: अपलोड केलेले कागदपत्र वैध मानली जाणार नाहीत.

सध्या रेल्वे प्रवास करताना पुढील ओळखपत्राचे पुरावे वैध मानले जातात.

 1. निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक ओळखपत्र
 2. पासपोर्ट
 3. प्राप्ती कर विभागाने दिलेले पॅन कार्ड
 4. आटीओने दिलेला वाहन परवाना
 5. केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेले ओळखपत्र
 6. मान्यताप्राप्त शाळा अथवा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र
 7. राष्ट्रीयकृत बँकेचे छायाचित्रासह पासबुक
 8. बँकांनी जारी केलेले क्रेडीट कार्ड लॅमिनेटेड छायाचित्रासह
 9. विशिष्ट ओळखपत्र-आधार, एम-आधार आणि ई-आधार
 10.  राज्य अथवा केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पंचायत प्रशासनाने दिलेले ओळखपत्र
 11. संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणालीद्वारे आरक्षित केलेल्या तिकिटाद्वारे स्लीपर आणि द्वितीय आरक्षित आसन श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना शिधा पत्रिकेचे छायाचित्रासह साक्षांकित प्रत आणि राष्ट्रीयकृत बँकेतून छायाचित्रासह पासबुक स्वीकारले जाते.