रुबरू ऑडी गोवा मि. इंडिया २०१८ मेगा मॉडेल स्पर्धच्या आयोजनासाठी गोवा सज्ज विजेत्याला मिळणार ऑडी कार

0
1014

 

गोवाखबर: भारतातील पुरुषांसाठी सर्वांत मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा ठरलेली रुबरू ऑडी गोवा मि. इंडिया २०१८
यंदा प्रथमच गोव्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ७ ते १० मार्च या दरम्यान या स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. बागा येथील लास ओलास हॉटेलमध्ये स्पर्धेची अंतिम फेरी १० मार्च
२०१८ रोजी होणार आहे. रुबरी ग्रुपद्वारे आयोजित या स्पर्धेचे यंदा १५वे वर्ष असून आजवरच्या
स्पर्धेच्या इतिहासातील भव्य स्वरूप यंदा अनुभवास मिळणार आहे.
जागतिक पातळीवर आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या ऑडीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी
टायटन स्पॉन्सर म्हणून रुबरू ग्रुपशी संबंध जोडले आहेत. देशात विविध ठिकाणी आयोजित निवड
चाचण्यांमधून विविध नवे व उभरते चेहरे या स्पर्धेसाठी निवडण्यात आले आणि गोव्यात होत
असलेल्या अंतिम राष्ट्रीय फेरीसाठी अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. संभाषण कौशल्य,
हुषारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर या स्पर्धेतील विजेत्यांची निवड होणार आहे.
प्राथमिक फेऱ्या व चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांची जेतेपदासाठी कसोटी लागणार असून
स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व
करण्याची संधी मिळणार आहे.
७ मार्च २०१८ रोजी स्पर्धकांचे गोव्यातील ला विदामध्ये आगमन होत आहे. कसिनो प्राइडमध्ये शुटिंग
झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांचे रॅम्प वॉकचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी
स्पर्धकांचा किनाऱ्यावर शुटिंग कार्यक्रम होणार असून त्यानंतर हे स्पर्धक गोव्यातील एका गावा स्वच्छ
भारत मोहिमेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील व त्यानंतर पाककला स्पर्धा होणार आहे.
त्याच दिवशी एका बालआश्रमासही ते भेट देतील. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी या स्पर्धकांसाठी प्रशिक्षण
व प्रोत्साहनपर वर्ग होणार आहेत.

रुबरू मि. इंडिया ही पुरुषांसाठीची भारतातील सर्वांत जुनी व लोकप्रिय अशी स्पर्धा गणली जाते. २००४
साली उत्तर भारतात पुरुष मॉडेल स्पर्धा म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता जगातील सर्वांत मोठ्या
लोकशाही देशातील लोकप्रिय पुरुष मॉडेलिंग स्पर्धा म्हणून उदयास आला आहे. रुबरू मि. इंडिया

उपक्रम १० जागतिक उपक्रमाशी संलग्न असून या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
विजेत्यांना एक व्यासपीठ देऊन देशासाठी गौरवशाली, अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
रुबरू मि. इंडिया उपक्रम १० जागतिक उपक्रमाशी संलग्न असून या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय विजेत्यांना एक व्यासपीठ देऊन देशासाठी गौरवशाली, अभिमानास्पद कामगिरी केली
आहे. आपल्या झगमगत्या दुनियेबरोबरच या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणासारख्या उदात्त
कार्यालाही प्रोत्साहन, पाठबळ दिले जाते. रुबरू मि. इंडिया विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये
आपले योगदान देण्याची संधी मिळते. तसेच १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक व
फॅशन उपक्रमांमध्ये सहभागी होता येते.
या स्पर्धेसाठी काही प्रमुख सहयोगी संस्था अशा : हॉस्पिटॅलिटी पार्टनर- ला विदा, अंतिम फेरी स्थळ
पार्टनर ला सोलास, हेअर अँड मेकअप् पार्टनर बिना पुंजानी, ऑनलाइन मीडिया पार्टनर- न्यूट्रल व्ह्यू,
विजेत्यासाठी बक्षीस पुरस्कर्ता- ज्युवेल एम्पायर डायमंड ब्रेसलेट, ट्रॅव्हल पार्टनर – ट्रॅव्हल होम, गिफ्ट
हॅम्पर डायमंड कफलिंग- प्रविताज ज्वेलर, डॉ. आमूद राव स्किन सर्जनी पार्टनर – रिडिफाइन
कॉस्मेटिक सर्जरी, ऑफिशिअल डिझायनर – सीमा मेहता, शूट लोकेशन पार्टनर- कसिनो प्राइड.
रुबरू मि. इंडिया स्पर्धेतील विजेतल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची
संधी मिळणार आहे. तसेच आगामी १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक व फॅशन
उपक्रमांमध्ये आणि रुपबर ग्रुपचा सहभाग असलेल्या विविध महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये
सहभागी होता येणार आहे.

ऑडी हा एक आघाडीचा जागतिक ऑटोमोबाइल ब्रँड आहे. ‘वोरस्प्रंग डर्च टेक्निक’ या ऑडीच्या विचारधारेशी ऑडी गोवा कटिबद्ध आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास, इतरांच्या पुढे राहणे आणि नवनवे मापदंड प्रस्थापित करणे या बाबी या विचारधारेतून प्रतिबिंबित होतात. २०१२
साली स्थापन झाल्यापासून ऑडी गोवाने सर्वोत्तमतेवर भर देतानाच त्यासाठी आवश्यक प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबीची पूर्तता करण्याची काळजी
घेतली आहे. ऑडीचे उच्च प्रशिक्षित व व्यावसायिक कर्मचारी वर्ग ऑडीची नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा मिळण्याची हमी देतात.
रुबरू ग्रुप विषयी :
मि. इंडिया ग्लोबल २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, मेगा मॉडेल स्पर्धा, मिस इंडिया इलाइट २०१३, २०१४, २०१५, २०१६ अशा अनेक
राष्ट्रीय स्पर्धांचे अधिकृत आयोजक म्हणून रुबरू ग्रुपची ओळख असून या क्षेत्रात या संस्थेने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. तसेच मिस्टर
इंटरनॅशनल (सिंगापूर), मिस्टर ग्लोबल (थायलंड), मिस्टर मॉडेल इंटरनॅशनल (मियामी, अमेरिका), मिस्टर युनिवर्स (डॉमिनिकन रिपब्लिक), मिस्टर
युनिवर्सल अम्बेसिडर (इंडोनेशिया), मिस्टर युनाटेड कॉंटिनन्ट (फिलिपिन्स), मिस सुपरमॉडेल इंटरनॅशनल (दक्षिण कोरिया), मिस ग्लोब (कॅनडा),
मिस टुरिझम इंटरनॅशनल (श्रीलंका), फेस ऑफ ब्युटी इंटरॅशनल (न्यूझीलंड), मिस वर्ल्ड ब्युटी क्वीन (सेऊल), टॉप इंटरनॅशनल मॉडेल ऑफ दि
वर्ल्ड (रोमानिया) अशा अनेक सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अधिकृत परवानाधारक म्हणून या संस्थेची ओळख आहे. संस्थेच्या स्पर्धांमधील
राष्ट्रीय विजेते जगभरातील ४०हून अधिक देशांमध्ये मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत असतात.