रिव्हायव्ह वेलनेस सेंटर ताळगावतर्फे वळवई येथे रविवारी मोफत वैद्यकीय शिबीर

0
858
गोवा खबर:ताळगाव येथील ‘रिव्हायव्ह वेलनेस सेंटर’ क्लिनीक तर्फे आता गावा गावातून वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. रविवारी 23 फेब्रुवारी रोजी गजांतलक्ष्मी स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब वळवई यांच्या संयुक्त विद्यमाने एका मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. देवस्थानच्या शेजारी असलेल्या तारी सोसायटीच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे. या शिबिरात  गुडघे दुखी (संधीवात) या रोगावर मात करण्यासाठी,  गुडघे दुखी असलेल्या लोकांना गुडघे प्रत्यारोपण (knee replacement) करण्या येवजी उपाय, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा आजाराची तपासणी होइल व योग्य तो सल्ला दिला जाणार आहे.
या शिबिरात ओझोन थेरपीच्या माध्यमातून यशस्वी उपचार कसा करता येतो यावर महाराष्ट्रातील अनुभवी डॉक्टर ‘नोएल ब्रिटो’ मार्गदर्शन करणार आहेत. या व्यतिरिक्त ओझोनच्या थेरपीतुन डायबिटीस मुळे बऱ्या न होणाऱ्या जखमा यावर उपयुक्त व खात्रीशीर उपाय कसा करता येतो यावर सल्ला देतील.
निसर्गोपचारा मुळे माणूस उच्च रक्तदाब व मधुमेहा वर पूर्ण नियंत्रण कस ठेवू शकतो यावर डॉक्टर फ्रँकलिन हर्बर्टदास हे बेंगळुरू येथील डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
या शिवाय एसआरएल डायग्नोस्टिक यासंस्थेतर्फे या शिबिरात मोफत डायबेटीस व कोलेस्ट्रॉल तपासणी करण्यात येणार आहे. रोगांच मूळ कारण आपण पीत असलेल पाणी असू शकत, तुम्ही पीत असलेलं पाणी शुद्ध की अशुद्ध आहे ते तपासून बघायच असल्यास शिबिरात येणाऱ्या शिबिरार्थीनी येताना स्वतःच घरच पाणी घेऊन याव असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. अधिक माहिती साठी ‘revive wellness center goa’ या फेसबूक पेजवर किंवा 08322233506 / 9923415622 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.