रिवण येथे 10 रोजी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

0
176
गोवा खबर : गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती किसान विभागातर्फे  सांगे मतदारसंघातील रिवण येथे शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजता सार्वजनीक गणेशोत्सव मंडपात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काॅंग्रेस किसान विभागाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी दिली. त्यांच्या सोबत दक्षिण गोवा जिल्हा काॅंग्रेस सदस्य चंदा वेळीप व सांगे युवक काॅंग्रेस अध्यक्ष प्रकाश भगत उपस्थित होते.
या मेळाव्याला काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, खासदार फ्रांसीस सार्दिन तसेच पक्षाचे अन्य आमदार व पदाधिकारी हजर राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रातील मोदी सरकारने किसान विरोधी तिन कायदे लागू केल्याने देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु, भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी काॅंग्रेस पक्ष प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणुन हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
म्हादई प्रश्नावर गोव्याचा विश्वासघात करणारे केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर हे गोव्यात शेतकरी कायद्याची माहिती देण्यासाठी आले, परंतु उस , काजू उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या ऐकुन घेण्यास त्याना वेळ नव्हता. त्यांच्या भेटीचे समर्थन करणारे कृषी मंत्री बाबू कवळेकर यांनी रिवणला येऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकाव्यात अशी मागणी अभिजीत देसाई यांनी केली.