रिलायन्स रिटेलने  24,713 कोटी रुपयांना खरेदी केला फ्युचर ग्रुपचा व्यवसाय

0
296

गोवा खबर: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय 24 हजार 713 दशलक्षमध्ये खरेदी केला आहे. हा मेगा डील रिटेल व्यवसायात कंपनीची स्थिती आणखी मजबूत करेल. भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये अमेझॉनसारख्या दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेल आपले पाय बळकट करत आहे.

कराराचा भाग म्हणून, फ्यूचर ग्रुप काही कंपन्यांना फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (एफईएल) मध्ये विलीन करीत आहे. या योजनेंतर्गत रिटेल आणि घाऊक उद्यम रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड (आरआरएफएलएल) कडेवर्ग करण्यात येत आहेत. ही आरआरव्हीएलची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे; रसद व गोदाम उपक्रम आरआरव्हीएलकडे वर्ग करण्यात येत आहेत.

रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या: “फ्यूचर समूहाच्या सुप्रसिद्ध ब्रँड तसेच त्याच्या व्यावसायिक इको सिस्टीमचे जतन करण्यात आम्हाला आनंद होईल. भारतात आधुनिक किरकोळ विकासासाठी हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आम्हाला आशा आहे की लहान व्यापारी, किराणा दुकानआणि मोठ्या ग्राहक ब्रॅण्डच्या सहभागाने किरकोळ क्षेत्रात वाढीची गती कायम राहील, आम्ही देशभरातील आमच्या ग्राहकांना चांगले मूल्य प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. “

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी किरकोळ व्यवसायात 3 कोटी किराणा मालक आणि 12 कोटी शेतकरी जोडण्याचे लक्ष्य केले होते. रिलायन्स फ्यूचर समूहाचा रिटेल, घाऊक व पुरवठा साखळी व्यवसाय मिळवून आपले स्थान मजबूत करीत आहे